Tree plantation: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवार, १४ जुलै रोजी राज्यभर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याच अनुषंगाने देऊळगाव राजा बसस्थानक परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

‘हरित महाराष्ट्र’चा संदेश; एसटीच्या वर्धापनदिनानिमित्त बसस्थानक परिसर हिरवागार
प्रा. अशोक डोइफोडे
देऊळगाव राजा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवार, १४ जुलै रोजी राज्यभर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याच अनुषंगाने देऊळगाव राजा बसस्थानक परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते घनशिराम शिपणे हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्रवासी कल्याण संस्थेचे प्रा. विनायकराव कुलकर्णी यांनी एसटी महामंडळाच्या कार्याचा आढावा घेत, ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एसटीचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक श्री. गायकवाड, श्री. सानप, श्री. खारडे, श्री. खांडेभराड, श्री. अवचार तसेच सौ. खिल्लारे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. स्वागत समारंभानंतर बसस्थानक परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष संतोषभाऊ खांडेभराड, दादाराव खारडे, गटशिक्षणाधिकारी दादाराव मसुदवाले, रामदास डोईफोडे, संतोष पुजारी, रंजीत काकड, नगरसेवक नासिरभाई, तेजराव मुंडे, पोलीस उपनिरीक्षक नारायणराव गीते, जायभाये साहेब, दामिनी पथक प्रमुख सौ. जयश्रीताई काकड, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ संलग्नित देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा. विनायकराव कुलकर्णी, पत्रकार संघाचे सचिव तथा ज्येष्ठ पत्रकार सुरजभाऊ गुप्ता, पत्रकार शेख कदीरभाई, राहुल नायर तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायकराव कुलकर्णी यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभारही त्यांनीच मानले.

