Mahabreaking

[breaking_news]

Samarth Pharmacy  :समर्थ फार्मसीचा निकालात दबदबा; बी.फार्म अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण

Samarth Pharmacy  :श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचा शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील बी. फार्मसी अंतिम वर्ष (सत्र आठवे) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सर्वोच्च श्रेणी व उच्च श्रेणीमध्ये यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

Samarth Pharmacy

औषधनिर्माण क्षेत्रात समर्थ विद्यार्थ्यांची गगनभरारी; रुतुजा मंडलकर प्रथम

गजानन तिडके

देऊळगाव राजा : श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचा शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील बी. फार्मसी अंतिम वर्ष (सत्र आठवे) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सर्वोच्च श्रेणी व उच्च श्रेणीमध्ये यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत औषधनिर्माण शिक्षण क्षेत्रातील आपला दबदबा सिद्ध केला आहे. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळवत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.

निकालामध्ये विद्यार्थिनी रुतुजा मंडलकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. वैशाली वाढे हिने द्वितीय, आरती खार्डे हिने तृतीय तर दिपाली तिडके हिने चतुर्थ क्रमांक मिळविला. याशिवाय करण दाभाडे पाचवा, रवी वाघ सहावा, ओंकार व्यवहारे सातवा, फाल्गुनी अग्रवाल आठवा, ऋतुजा झोरे नववा तर राजश्री वाघ, आकांक्षा बैरागी आणि प्राची सावळे यांनी संयुक्तरित्या दहावा क्रमांक प्राप्त केला.

महाविद्यालयात डी. फार्मसी, बी. फार्मसी तसेच एम. फार्मसी (फार्माकोग्नोसी, फार्माकोलॉजी व फार्मास्युटिक्स) असे विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. महाविद्यालयाचे वय अवघे सात वर्षे असले तरी अनुभवी प्राध्यापकवर्ग, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतीमुळे महाविद्यालयाने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे, सचिव सतीशभाऊ कायंदे, सहसचिव तथा आमदार मनोजभाऊ कायंदे, संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. पी. आर. ताठे, उपप्राचार्य डॉ. जी. आर. सीताफळे, विभागप्रमुख डॉ. पी. आर. लड्डा, प्रा. के. बी. चराटे, डॉ. दिनेश घुबे, डॉ. नारखेडे, डॉ. गिरी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.यावेळी प्राचार्य डॉ. पी. आर. ताठे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातही यशाची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन करत महाविद्यालय त्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी सदैव मार्गदर्शन करण्यास तत्पर राहील, अशी ग्वाही दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top