Mahabreaking

[breaking_news]

Sanjay Vikhe :एकलारा बानोदाच्या संजय विखेची राज्यस्तरीय झेप; MHT-CET मध्ये 99.60 पर्सेंटाइल

Sanjay Vikhe : तालुक्यातील एकलारा बानोदा येथील सुपुत्र संजय विजय विखे याने महाराष्ट्र शासनाच्या MHT-CET (PCB गट) 2026 परीक्षेत तब्बल 99.60 पर्सेंटाइल गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या नेत्रदीपक यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संजयवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Sanjay Vikhe

जिद्द, मेहनत अन् यशाची सुवर्णकथा; संजय विखेने उज्ज्वल केले गावाचे नाव

सौरभ धर्माधिकारी

संग्रामपूर : तालुक्यातील एकलारा बानोदा येथील सुपुत्र संजय विजय विखे याने महाराष्ट्र शासनाच्या MHT-CET (PCB गट) 2026 परीक्षेत तब्बल 99.60 पर्सेंटाइल गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या नेत्रदीपक यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संजयवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाणारी MHT-CET परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक स्वरूपाची असते. अशा परीक्षेत संजयने भौतिकशास्त्रात 98.87, रसायनशास्त्रात 99.76 आणि जीवशास्त्रात 99.42 पर्सेंटाइल गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि यश मिळविण्याची जिद्द यांच्या जोरावर त्याने हे यश प्राप्त केले आहे.

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत एकलारा बानोदा गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. संजयच्या यशामुळे गावासह परिसरातील विद्यार्थी आणि पालकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संजयच्या यशामागे त्याचे आई-वडील विजय विखे आणि सौ. ज्योती विखे यांचे मोलाचे योगदान असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि केलेले प्रोत्साहन आज खऱ्या अर्थाने फळाला आल्याचे बोलले जात आहे.संजयच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्याच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठी प्रेरणा मिळणार असून मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्याने सिद्ध करून दाखविले आहे. संजय विखेच्या या यशाने एकलारा बानोदा गावाच्या शैक्षणिक वाटचालीत अभिमानाचा नवा अध्याय जोडला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top