Mahabreaking

[breaking_news]

Country-made pistol :पातुरात देशी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Country-made pistol :पातुर शहरातील टिकेवी चौक परिसरात एका संशयित इसमाकडून देशी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पातुर पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत ही कारवाई करण्यात आली असून आरोपीविरुद्ध पातुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Country-made pistol

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्रसाठा पकडला; पातुरात खळबळ

निशांत गवई 

पातुर : पातुर शहरातील टिकेवी चौक परिसरात एका संशयित इसमाकडून देशी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पातुर पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत ही कारवाई करण्यात आली असून आरोपीविरुद्ध पातुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, टिकेवी चौक परिसरात एक व्यक्ती अवैध शस्त्र बाळगून संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ६ जून २०२६ रोजी दुपारच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि पातुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

बसस्थानकासमोरील टिकेवी चौकातील महाविद्यालयाच्या गेट क्रमांक दोनजवळ संशयित व्यक्ती आढळून आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी कट्टा व एक जिवंत काडतूस असा सुमारे ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव सुरज शंकर सोनटक्के (रा. चिखलवाडी, जि. नांदेड) असे आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल दिगंबर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पातुर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३२२/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वये (आर्म्स ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पातुर शहरात नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन विशेष दक्षता घेत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी सातत्याने आढावा घेत असताना ही कारवाई झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. सदर आरोपी पातुर येथे शस्त्र विक्रीसाठी आला असावा, असा संशय काही नागरिकांकडून व्यक्त केला जात असला तरी याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बंडू मेश्राम करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top