Mahabreaking

[breaking_news]

Horrific accident :समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; खासगी बस ट्रकवर आदळली, २५ प्रवासी जखमी

Horrific accident : ‘बाबा ट्रॅव्हल्स’च्या भरधाव खाजगी लक्झरी बस ट्रकवर आदळल्याने २५ प्रवासी जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सोमवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या दरम्यान मेहकरजवळील पिंपरी माळी-शहापूर गावाजवळ घडली.

Horrific accident

मेहकरजवळ समृद्धीवर मध्यरात्रीचा थरार; लक्झरी बसचा चुराडा, दोघांची प्रकृती गंभीर

डोणगाव : ‘बाबा ट्रॅव्हल्स’च्या भरधाव खाजगी लक्झरी बस ट्रकवर आदळल्याने २५ प्रवासी जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सोमवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या दरम्यान मेहकरजवळील पिंपरी माळी-शहापूर गावाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा ट्रॅव्हल्सची खाजगी प्रवासी बस पुण्याहून नागपूरकडे प्रवाशांना घेऊन जात होती. पहाटे ४ वाजेच्या सुमारास बस पिंपरी माळी गावाच्या शिवारात आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बसने समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर बसमध्ये एकच किंचाळ्या व आक्रोश सुरू झाला. धडकेमुळे बसचा पुढील भाग दबला गेल्याने काही प्रवासी सुमारे एक ते दीड तास बसमध्येच अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, मेहकर पोलीस तसेच समृद्धी महामार्गावरील बचाव पथक रुग्णवाहिकांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कटरच्या साहाय्याने आणि इतर प्रयत्नांद्वारे बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका केली. सर्व जखमींना तातडीने मेहकर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. या प्रकरणी मेहकर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
समृद्धी महामार्गावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यात चालकांना अपयश येत असल्याने अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top