Mahabreaking

[breaking_news]

Training in various sports :ग्रीष्मकालीन शिबिरात २०० खेळाडूंना विविध खेळांचे प्रशिक्षण; जय बजरंग व्यायाम शाळेचा अभिनव उपक्रम

Training in various sports : जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जय बजरंग व्यायाम शाळा केंद्र, कुंभारी आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहा दिवसीय ग्रीष्मकालीन निवासी शिबिरात विद्यार्थ्यांना विविध शालेय खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या शिबिरात ग्रामीण भागातील सुमारे २०० विद्यार्थी-खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.

Training in various sports

ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय स्तराकडे वाटचाल; कुंभारी येथे निवासी क्रीडा शिबिर उत्साहात

संजय तायडे  

बोरगाव मंजू : जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जय बजरंग व्यायाम शाळा केंद्र, कुंभारी आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहा दिवसीय ग्रीष्मकालीन निवासी शिबिरात विद्यार्थ्यांना विविध शालेय खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या शिबिरात ग्रामीण भागातील सुमारे २०० विद्यार्थी-खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.

जय बजरंग व्यायाम शाळेचे संस्थापक स्व. क्रीडामहर्षी तथा माजी आमदार तुकारामभाऊ बिडकर यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील युवक-युवतींना एकत्रित करून अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अमरावतीसह राज्यभर व्यायाम शाळांचे जाळे उभे केले. त्यांच्या या कार्यामुळे ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली.

स्व. तुकारामभाऊ बिडकर यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत जय बजरंग व्यायाम शाळेचे संचालक प्रकाशभाऊ बिडकर यांच्या पुढाकारातून १ जून ते १० जून दरम्यान हे निवासी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात धनुर्विद्या, नेटबॉल, थ्रोबॉल, योगासने, लेझीम, मल्लखांब, लाठी-काठी यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांसह संस्कार, स्वयंशिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण दिले जात आहे.

शिबिरात नामवंत प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून, विविध कलांद्वारे त्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जात आहे. शिक्षणाबरोबरच ज्ञान, कला आणि क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने जय बजरंग व्यायाम शाळा केंद्र सातत्याने कार्यरत आहे. विशेष म्हणजे, उन्हाळ्याच्या कडाक्यात प्रशिक्षण घेणाऱ्या सुमारे २०० खेळाडू विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजनाची मोफत व्यवस्था संचालक प्रकाशभाऊ बिडकर यांनी उपलब्ध करून दिली आहे.

जय बजरंग माध्यमिक विद्यालय व जय बजरंग व्यायाम शाळा केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाशभाऊ बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक, व्यवस्थापक व इतर सहकारी परिश्रम घेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top