Mahabreaking

[breaking_news]

Fugitive Accused  :फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सांगलीतून केले जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Fugitive Accused  : फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला सांगली येथून गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व बुलढाणा शहर पोलिसांना यश आले आहे. आरोपीविरुद्ध फसवणूक व विश्वासघाताच्या गुन्ह्यांत कारवाई सुरू असून त्याला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Fugitive Accused 
गजानन तिडके
देऊळगाव राजा : फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला सांगली येथून गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व बुलढाणा शहर पोलिसांना यश आले आहे. आरोपीविरुद्ध फसवणूक व विश्वासघाताच्या गुन्ह्यांत कारवाई सुरू असून त्याला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
माहितीनुसार, बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा क्रमांक १०८/२०२४ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०६ व ३४ अन्वये फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. या प्रकरणातील आरोपी अजय वसंतराव काळे हा फरार होता.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने तपासाची चक्रे गतिमान केली. तपासादरम्यान आरोपीचा ठावठिकाणा सांगली जिल्ह्यातील कलानगर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश सावळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर कपाटे, पोलीस शिपाई दीपक वायाळ व राजेंद्र गडकर यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या या कारवाईमुळे फसवणुकीच्या प्रकरणातील तपासाला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top