Do not become subservient :जिवनात व्यसनाधीनता वाढत चालली आहे . आपली मुले आपल्या समोर वाम मार्गाने चालली तर लहाणपणापासूनच आवर घाला , कोणत्याही गोष्टीला अधिन जाऊ नका तो विनाशाचा मार्ग आहे, असे प्रबोधन प्रेममृर्ती जगदिशानंद शास्त्री आळंदी यांनी पहिल्या दिवशी शिवपुराण कथेतून केले.

शिवपुराण कथेच्या पहिल्या दिवशी जगदिश शास्त्री यांचे प्रबोधन
अशोक इंगळे
साखरखेर्डा : जिवनात व्यसनाधीनता वाढत चालली आहे . आपली मुले आपल्या समोर वाम मार्गाने चालली तर लहाणपणापासूनच आवर घाला , कोणत्याही गोष्टीला अधिन जाऊ नका तो विनाशाचा मार्ग आहे, असे प्रबोधन प्रेममृर्ती जगदिशानंद शास्त्री आळंदी यांनी पहिल्या दिवशी शिवपुराण कथेतून केले.

तिर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील श्री पलसिध्द महास्वामी मठात सात दिवसीय शिवपुराण कथेचे आयोजन केले आहे . भव्य दिव्य सभामंडपात हजारो भाविकांना याचा लाभ घेता यावा अशी व्यवस्था करण्यात आली .
शिवपुराण कथेचे पुष्प गुंफताना शास्त्री म्हणाले की , प्रत्येक व्यक्तीची आवड चांगली पाहिजे . माणसाची वृत्ती चांगली असली की कोणत्याही कामात यश प्राप्त होते . कलियुगात दान , धर्म करणे आवश्यक आहे . अभिमान बाळगू नका कारण तो कधी गळून पडेल हे कळणार नाही . धार्मिक कार्य करीत असताना सोमवारी बेल तोडू नका , रविवारी तोडून ठेवा , एकादशीला केळी श्रवण करु नका , याचे फायदे आणि तोटे यावेळी सविस्तर कथेतून दाखले देत श्रोत्यांसमोर मांडले . मुलांना लहानपणापासूनच चांगल्या सवयी लावा . तो दिवसातून किमान १० तास अभ्यासात असला पाहिजे . १० वी पर्यंत ही सवय लागली की १२ वीत तो नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय राहणार नाही . त्यासाठी अगोदर आपण नीट राहा . देवराज ब्राह्मणाची कथा सादर करताना शास्त्री म्हणाले की मुलं ही व्यसनाधीनच्या आहारी गेली नाही पाहिजे . जर मुलगा व्यसनाधीन झाला तर घराचे वासे फिरते महाराष्ट्र राज्य हे व्यसनमुक्त झाले पाहिजे . यासाठी साधू , संत , वारकरी हे उपदेश करीत असतात . आई वडील यांनाही वाटते की आपला मुलगा व्यसनाधीन झाला नाही पाहिजे . यासाठी प्रत्येक आई वडीलांनी सतर्क राहिले पाहिजे. मदीरा आणि मांस हे जिवणाचे अंग नाही . आज व्यसनाचे अनेक प्रकार आहेत . आज प्रत्येक महिला व पुरुष यांच्याजवळ मोबाईल फोन आहे . सतत मोबाईलमध्ये लक्ष केंद्रित करून समोरचा माणूस काय बोलतो याकडे लक्ष नसते . मोबाईलचा वापर करा पण त्याच्या आहारी जाऊ नका . लहान मुलांना दुर ठेवा . असा सल्ला त्यांनी दिला .
शिवपुराण कथेच्या पहिल्या दिवशी श्रोत्यांची संख्या लक्षणीय होती . संगीतमय शिवपुराण कथेचे श्रवण करताना भाविक मंत्रमुग्ध होऊन नाचत होते . महिला पावली आणि फुगडी खेळताना रंगत आली होती . सात दिवस चालणाऱ्या शिवपुराण कथेचे श्रवण करण्यासाठी दुर दुर वरुन भाविक आले असून त्यांची संपूर्ण व्यवस्था संस्थांमध्ये करण्यात आली . नियोजनाची जबाबदारी स्वतः मठाधिपती सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज , विश्वनाथ अप्पा जितकर , गुंड्डाप्पा स्वामी आणि संस्थानचा भक्त सांभाळत आहेत.

