Mahabreaking

[breaking_news]

Hindu-Muslim Unity :इफ्तार पार्टीत हिंदू-मुस्लिम ऐक्य; साखरखेर्ड्यात बंधुत्वाचा सुंदर संदेश

Hindu-Muslim Unity : रमजान महिन्याच्या पवित्र पार्श्वभूमीवर साखरखेर्डा येथील जामा (दगडी) मस्जिदीत आयोजित इफ्तार पार्टीत हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकात्मतेचे सुंदर दर्शन घडवत बंधुत्वाचा संदेश दिला. या कार्यक्रमाला माजी मंत्री Dr. Rajendra Shingne यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

Hindu-Muslim Unity

डॉ. शिंगणे यांच्या उपस्थितीत इफ्तार सोहळा; एकात्मतेची परंपरा जपली

साखरखेर्डा: रमजान महिन्याच्या पवित्र पार्श्वभूमीवर साखरखेर्डा येथील जामा (दगडी) मस्जिदीत आयोजित इफ्तार पार्टीत हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकात्मतेचे सुंदर दर्शन घडवत बंधुत्वाचा संदेश दिला. या कार्यक्रमाला माजी मंत्री Dr. Rajendra Shingne यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांकडून रोजा ठेवून अल्लाहची प्रार्थना केली जाते. या पवित्र कालावधीच्या निमित्ताने १८ मार्च रोजी सायंकाळी आयोजित इफ्तार पार्टीत सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश दिला.
यावेळी बोलताना डॉ. शिंगणे यांनी, “ईद हा केवळ सण नसून राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुत्वाची शिकवण देणारा उत्सव आहे. सर्वांनी आपले सण एकत्र साजरे करून परस्परांमध्ये प्रेम आणि सौहार्द वाढवले पाहिजे,” असे प्रतिपादन केले. तसेच साखरखेर्डा गावाशी असलेले जुने संबंध जपण्याचे आवाहनही त्यांनी केले. इफ्तार पार्टीत सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी केले होते. कार्यक्रमानंतर डॉ. शिंगणे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाची पाहणीही केली.
या प्रसंगी माजी पंचायत समिती सभापती राजू ठोके, माजी सरपंच कमलाकर गवई, उपसरपंच संग्रामसिंह राजपूत, माजी सरपंच दाऊद कुरेशी, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष मंडळकर, ठाणेदार गजानन करेवाड यांच्यासह विविध मान्यवर आणि मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते. या इफ्तार सोहळ्यामुळे साखरखेर्डा परिसरात सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा सकारात्मक संदेश पसरला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top