Mahabreaking

[breaking_news]

Outrageous Act :देऊळगाव राजात संतापजनक कृत्य; पोटच्या मुलासोबत अश्लील चाळे, पत्नीवर अत्याचार  

Outrageous Act :माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना देऊळगाव राजा शहरात उघडकीस आली आहे. नराधम पतीने स्वतःच्या अल्पवयीन मुलासोबत अश्लील लैंगिक चाळे करत, पत्नीवर इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी पोलिसांनी पतीसह तब्बल १३ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

Outrageous Act

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना देऊळगाव राजा शहरात उघडकीस आली आहे. नराधम पतीने स्वतःच्या अल्पवयीन मुलासोबत अश्लील लैंगिक चाळे करत, पत्नीवर इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी पोलिसांनी पतीसह तब्बल १३ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
सिव्हिल कॉलनी परिसरातील ३० वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी पती दीपक (वय ३८) याने २३ नोव्हेंबर २०२५ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत स्वतःच्या अल्पवयीन मुलावर अश्लील कृत्ये केली. एवढ्यावरच न थांबता, पत्नीच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत तिचा मानसिक व शारीरिक छळ केला.
या अमानुष प्रकाराची माहिती पीडित महिलेने सासरच्या मंडळींना दिली असता, न्याय देण्याऐवजी तिलाच धमक्यांचा सामना करावा लागला. “घराची बदनामी करू नकोस, अन्यथा जिवंत ठेवणार नाही,” अशा शब्दांत तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरूनही तिचा छळ करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
या प्रकरणात सासरच्या एकूण १३ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top