Mahabreaking

🔴 BREAKING
Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Dr. Deepak Bhagat :डॉ. दीपक भगत यांना इंग्लंडचे डिझाईन पेटंट जाहीर Leopard attack :शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वानराचा बळी, शेतकऱ्यांत घबराट Smoke and flames create :धूर आणि ज्वाळांनी महामार्गावर खळबळ; वाहनचालकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली Azim Nawaz Rahi :अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ला लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर 18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Dr. Deepak Bhagat :डॉ. दीपक भगत यांना इंग्लंडचे डिझाईन पेटंट जाहीर Leopard attack :शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वानराचा बळी, शेतकऱ्यांत घबराट Smoke and flames create :धूर आणि ज्वाळांनी महामार्गावर खळबळ; वाहनचालकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली Azim Nawaz Rahi :अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ला लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर 18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त

Dr. Deepak Bhagat :डॉ. दीपक भगत यांना इंग्लंडचे डिझाईन पेटंट जाहीर

Dr. Deepak Bhagat : नेहरू महाविद्यालय, नेर येथील भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. दीपक जालिंदर भगत यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिझाईन पेटंट जाहीर झाले आहे. औषधी वनस्पतींच्या बियाण्यांमधून उच्च दर्जाचे तेल अधिक कार्यक्षमतेने काढण्यासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानासाठी हे पेटंट प्रदान करण्यात आले आहे.

Dr. Deepak Bhagat

वाडेगाव : नेहरू महाविद्यालय, नेर येथील भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. दीपक जालिंदर भगत यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिझाईन पेटंट जाहीर झाले आहे. औषधी वनस्पतींच्या बियाण्यांमधून उच्च दर्जाचे तेल अधिक कार्यक्षमतेने काढण्यासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानासाठी हे पेटंट प्रदान करण्यात आले आहे.

खाजगी शाळांना टक्कर; जिल्हा परिषद शाळेत संगणकीय शिक्षणाला प्राधान्य

पातूर तालुक्यातील सस्ती येथील श्री स. ल. शिंदे विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले डॉ. भगत यांच्या या बौद्धिक संपदेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांतील प्रा. राजकुमार सालोडकर, डॉ. मिलिंद बेलखेडकर, डॉ. गोपाळ ढोकणे, डॉ. राजीव बेलेकर, प्रा. विशाल भिसे, संशोधक सतीश आठवले, डॉ. जगन्नाथ गोडसे, संशोधक शुभांगी आठवले, डॉ. संतोष गायकवाड, डॉ. निखिलिश बजाज आणि डॉ. अमरदीप जाधव यांचा संयुक्त सहभाग आहे.

औषधी वनस्पतींच्या बियाण्यांमधून अधिक शुद्धतेचे व दर्जेदार तेल काढण्यासाठी विकसित करण्यात आलेले एआय-आधारित इलेक्ट्रिक मफल फर्नेस हे आधुनिक उपकरण पारंपरिक पद्धतींतील अचूकतेच्या मर्यादांवर मात करते. पलाश, करंज यांसारख्या बियाण्यांमधून उच्च गुणवत्तेचे तेल मिळविण्यास हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. या प्रणालीमुळे पारंपरिक मफल फर्नेसच्या तुलनेत सुमारे ४० टक्के ऊर्जा बचत आणि ३० टक्के अधिक तेल गुणवत्ता साध्य होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

औषधनिर्मिती व सौंदर्यप्रसाधन उद्योगांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या तंत्रज्ञानाला इंग्लंडच्या बौद्धिक संपदा कार्यालयाकडून डिझाईन पेटंटची मान्यता मिळाली असून लवकरच ते व्यावसायिक स्तरावर उपलब्ध होणार आहे.

डॉ. भगत यांच्या या यशाबद्दल नेहरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. परमानंदजी अग्रवाल, कार्याध्यक्ष रवीभाऊ अग्रवाल, उपाध्यक्ष राजेंद्रजी चिरडे, सचिव हाजी मजहर खान पठाण, प्राचार्य डॉ. उदय मांजरे तसेच सर्व संचालक मंडळ व प्राध्यापकवर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top