Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Youth killed :अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार ; सिंदखेड राजा टी-पॉईंटवरील घटना

Youth killed : सिंदखेड राजा टी-पॉईंट येथे भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या अज्ञात चालकाच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २३ फेब्रुवारी रोजी पहाटे घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश सदाशिव कांबळे रा. देऊळगाव राजा असे मृतकाचे नाव आहे.

Youth killed

अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : सिंदखेड राजा टी-पॉईंट येथे भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या अज्ञात चालकाच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २३ फेब्रुवारी रोजी पहाटे घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश सदाशिव कांबळे रा. देऊळगाव राजा असे मृतकाचे नाव आहे.

भरधाव बसने दुचाकीस उडवले, पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी

याबाबत सदाशिव काशीनाथ कांबळे (वय ७०, रा. त्र्यंबक नगर, देऊळगाव राजा, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून कायम अप. क्र. ८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), १२५(अ) तसेच मोटार वाहन कायदा १९८९ च्या कलम १३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा प्रकाश सदाशिव कांबळे हा जालना रोडवरील एका ढाब्यावर काम करत होता. २३ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास तो कामावरून घरी परतत असताना सिंदखेड राजा टी-पॉईंट येथे अज्ञात वाहनचालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रकाश कांबळे गंभीर जखमी झाला.त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय, देऊळगाव राजा येथे उपचारासाठी नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर वाहनचालक फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.सदर गुन्ह्याची नोंद सहाय्यक फौजदार गीते यांनी केली असून पुढील तपास ठाणेदार ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top