Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Mangala Akotkar :मंगला अकोटकार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Mangala Akotkar : जळगाव जामोद येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक पॅनल (एमएसपी) संचालित शिक्षक फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडेगाव, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा येथील सहायक शिक्षिका सौ. मंगला पातळे (अकोटकार) यांना जाहीर झाला आहे.

Mangala Akotkar

साखरखेर्डा : जळगाव जामोद येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक पॅनल (एमएसपी) संचालित शिक्षक फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडेगाव, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा येथील सहायक शिक्षिका सौ. मंगला पातळे (अकोटकार) यांना जाहीर झाला आहे.

सातपुड्यातील पत्रकारितेचा गौरव;‘आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्काराने संग्रामपूरचा मान उंचावला

सौ. अकोटकार या २०१८ पासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गाडेगाव येथील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळेत त्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषय शिकवितात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.

एनएमएसएस परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन

विद्यार्थ्यांना National Means-cum-Merit Scholarship Scheme (एनएमएसएस) स्पर्धा परीक्षेसाठी त्या विशेष परिश्रम घेतात. स्वतःच्या खर्चाने मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना प्राविण्य मिळवण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून त्यांना दरवर्षी १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळत आहे.

सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमात पुढाकार

शाळेत विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, प्रोत्साहनपर बक्षीस वितरण, विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करणे तसेच शैक्षणिक क्षेत्रभेटींचे आयोजन असे विविध उपक्रम त्या राबवितात. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना आनंदी व आत्मविश्वासू ठेवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करतात.

रांगोळी स्पर्धा, कला उपक्रमांद्वारे मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठीही त्या विशेष प्रयत्नशील आहेत. १९९६ पासून सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या सौ. अकोटकार यांना विविध सांस्कृतिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. गायन, भावगीत व भक्तिगीत सादरीकरणातही त्यांना प्रावीण्य आहे.त्यांनी घडविलेले अनेक विद्यार्थी आज शिक्षक, डॉक्टर, वकील आदी उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top