SET exam results : विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या वतीने सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल रखडला हाेता. आता या निकालाचा मुहुर्त मिळाला असून येत्या ३० ऑगस्ट राेजी हा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे पुणे विद्यापीठाने जाहीर केले आहे. याविषयी विद्यापीठाच्या वेबसाईटवर परिपत्रक जारी करण्यात आले आहेत.
पुणे : विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या वतीने सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल रखडला हाेता. आता या निकालाचा मुहुर्त मिळाला असून येत्या ३० ऑगस्ट राेजी हा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे पुणे विद्यापीठाने जाहीर केले आहे. याविषयी विद्यापीठाच्या वेबसाईटवर परिपत्रक जारी करण्यात आले आहेत. विद्यापीठ अनुदान आयाेगाच्यावतीने १५ जून राेजी राज्यभरातील विविध केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली हाेती. महाराष्ट आणि गाेवा राज्यातील विविध विषयाच्या १ लाख १० हजार ४१२ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली हाेती. त्यापैकी ९० हजार ४४६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली हाेती. ८२ टक्के उमेदवारांनी या परीक्षेला हजेरी दिली हाेती.या परीक्षेच्या निकालास विलंब हाेत असल्याने अनेक संघटनांनी निवेदने दिली हाेती. पुणे विद्यापीठाने ४०व्या सेट परीक्षेत एसबीसी आरक्षण लागू करायचे कि नाही याविषयी मार्गदर्शन मागवण्यात आले हाेते. शासनाकडून त्याविषयी मार्गदर्शन आल्यानंतर हा निकाल आता ३० ऑगस्ट राेजी जाहीर करण्यात येणार आहे.