The annual general meeting : कृषी उत्पन्न बाजार समिती, पातुरची वार्षिक आमसभा रविवार, दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाली. या आमसभेच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती अरुण मारोती कचाले हाेते. सर्वप्रथम समितीचे सचिव किरण तायडे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. विषय क्र. १ ते ५ यावरील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. शेवटी आभारप्रदर्शन अजाबराव लाहोळे यांनी केले.

पातुर : कृषी उत्पन्न बाजार समिती, पातुरची वार्षिक आमसभा रविवार, दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाली.
या आमसभेच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती अरुण मारोती कचाले हाेते. सर्वप्रथम समितीचे सचिव किरण तायडे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. विषय क्र. १ ते ५ यावरील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. शेवटी आभारप्रदर्शन अजाबराव लाहोळे यांनी केले.
या वार्षिक आमसभेला उपसभापती राष्ट्रपाल गवई, संचालक राजेश महल्ले, राजेंद्र देशमुख, शंकर राठोड, मनोहर शिंदे, चंद्रकांत अंधारे, दिपक उजाडे, सौ. सिंधुबाई साहेबराव देवकते, सौ. संगोता संजय खोंड, गोपाल महल्ले, चरण चव्हाण, माणिकराव तायडे, गोटीराम चवरे, राजेश भाकरे, अर्जुन टप्पे, मोहसीन शफीउल्लाखां, शे. मुख्तार शे. नजिम आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच खरेदी-विक्री संघ, पातुरचे अध्यक्ष जगदीश पाचपोर, विष्णुपंत महल्ले, बबन हांडे, मधुकर राठोड, गजाननराव ताले, पंजाबराव देशमुख, सुदेश पाकदुने, अबुल हसन खॉ, श्रीकांत ताले, महादेव बांगर, कसनदास राठोड, शंकरराव नाभरे, दौलतराव घुगे, ज्ञानदेव वाट, खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक अजय देशमुख, दामोदर तायडे, मनिष ढोरे, सुरेश अढाऊ, लक्ष्मण खंडारे, निलेश ताले, तसेच समितीचे कर्मचारी मौजदारखों करोमखों, महादेव थिटे, सचिन मोरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

