Inter-college boxing : अमरावती विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा 2025-26 मध्ये पुरुष गटात संत गजानन महाराज कला महाविद्यालय, बोरगाव मंजू यांनी तर महिला गटात श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला यांनी अव्वल कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

अकोला : अमरावती विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा 2025-26 मध्ये पुरुष गटात संत गजानन महाराज कला महाविद्यालय, बोरगाव मंजू यांनी तर महिला गटात श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला यांनी अव्वल कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
क्रीडा प्रबोधिनी अकोला आणि जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील एकूण 17 मुले/मुलींची ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.
स्व. वसंत देसाई स्टेडियमवर 14 ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान ही स्पर्धा पार पडली. पुरुषांच्या गटात प्रथम क्रमांक संत गजानन महाराज कला महाविद्यालय बोरगाव मंजूच्या संघाने मिळवला तर द्वितीय क्रमांक यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, मंगरूळपीरने पटकावला.
महिला गटात श्री शिवाजी महाविद्यालय अकोला संघाने विजेतेपद पटकावले. द्वितीय क्रमांक संत श्री गजानन महाराज महाविद्यालय बोरगाव मंजूच्या संघाने मिळवला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ओमप्रकाश गजानन दाळू (सचिव, संत श्री गजानन महाराज शिक्षण संस्था), जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट, प्राचार्य पूजा सपकाळ आणि माजी प्राचार्य देवेंद्रजी गावंडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
समारोप प्रसंगी विद्यापीठ निवड समितीचे सदस्य प्रा. डॉ. गजानन बढे, प्रा. संजय काळे, प्रा. आळसपुरे, प्रा. कॅनडी सर तसेच विविध महाविद्यालयांचे शारीरिक शिक्षण संचालक व खेळाडू उपस्थित होते.
आयोजक व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. गजानन बढे यांनी सर्व विजेत्या संघांचे अभिनंदन करून उपस्थितांचे आभार मानले.

