road accident : वडगाव–पुनई मार्गावर झालेल्या रस्ते अपघातात सारोळापीर येथील ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. १३ जुलै) घडली. जखमी अवस्थेत त्याला ग्रामीण रुग्णालय, मोताळा येथे उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. सागर वासुदेव बावस्कर (वय ३५, रा. सारोळापीर) असे मृतकाचे नाव आहे. हा अपघात वडगाव–पुनई मार्गावर दुपारी २.१५ वाजण्यापूर्वी घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

वडगाव–पुनई मार्गावर दुर्दैवी अपघात; उपचारापूर्वीच युवकाचा मृत्यू
मोताळा : वडगाव–पुनई मार्गावर झालेल्या रस्ते अपघातात सारोळापीर येथील ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. १३ जुलै) घडली. जखमी अवस्थेत त्याला ग्रामीण रुग्णालय, मोताळा येथे उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. सागर वासुदेव बावस्कर (वय ३५, रा. सारोळापीर) असे मृतकाचे नाव आहे. हा अपघात वडगाव–पुनई मार्गावर दुपारी २.१५ वाजण्यापूर्वी घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
अपघातानंतर जखमी सागर बावस्कर यांना त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय, मोताळा येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. मस्के यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे पाठविण्यात आला.
ग्रामीण रुग्णालयातील कक्षसेवक दिपक शालीग्राम निमकर्डे यांनी पोलिसांना वैद्यकीय अहवाल (एमएलसी मेमो) सादर केल्यानंतर बोराखेडी पोलीस ठाण्यात कायमी मर्ग क्रमांक ४०/२०२६ भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणाची नोंद पोलीस उपनिरीक्षक दुर्गा निंबाळकर यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल खराडे करीत आहेत.
अपघाताचे नेमके कारण आणि परिस्थितीचा तपास सुरू असून, पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे. या घटनेमुळे सारोळापीर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

