Mahabreaking

[breaking_news]

Congress protests :रघुपती राघव राजाराम भजनातून काँग्रेसचे आंदोलन; राम मंदिर ट्रस्ट पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी

Congress protests : अयोध्या येथील राम मंदिर बांधकामातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आवाहनानुसार मेहकर तालुका काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ आंदोलन करण्यात आले. हनुमान मंदिर परिसरात भजन-कीर्तन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मेहकर पोलीस ठाणे गाठून संबंधित ट्रस्ट पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी तक्रार दिली.

Congress protests

राम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचा सत्याग्रह; मेहकर पोलिसांत तक्रार दाखल

   मेहकर : अयोध्या येथील राम मंदिर बांधकामातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आवाहनानुसार मेहकर तालुका काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ आंदोलन करण्यात आले. हनुमान मंदिर परिसरात भजन-कीर्तन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मेहकर पोलीस ठाणे गाठून संबंधित ट्रस्ट पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी तक्रार दिली.

आंदोलनकर्त्यांनी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी महंत गोपालदास, सरचिटणीस चंपत राय, ट्रस्टी डॉ. अनिल मिश्रा, कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी तसेच ट्रस्टचे इतर संबंधित पदाधिकारी आणि अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदविण्याची मागणी केली. तक्रार मेहकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या वतीने पोलिसांकडे सादर करण्यात आली.

यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, राम मंदिरासारख्या श्रद्धास्थानाच्या उभारणीच्या कामात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणात पारदर्शकता राखणे आणि जनतेसमोर वस्तुस्थिती आणणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष लक्ष्मणरावजी घुमरे, प्रदेश सरचिटणीस शामभाऊ उमाळकर, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वसंतराव (बापू) देशमुख, जिल्हा सरचिटणीस कलीम खान, विनायकराव टाले, शैलेश बावस्कर, वसीम कुरेशी, नगरसेवक मुज्जित खान, अत्तर कुरेशी, अजीम खान यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

तसेच गजेंद्र माने, गजानन राठोड, वामनराव मोरे, मनोज वानखेडे, गजानन देशमुख, गणेश मोसंबे, संतोष खरात, भुजंग काळे, राजाराम वाटसर, भानुदास अजगर, किशोर मरकड, दिलीप बोरे, मिलिंद खंडारे, फुगीर अहमद आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते.

दरम्यान, या आंदोलनातून काँग्रेसने राम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुन्हा एकदा जोरकसपणे मांडली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top