Mahabreaking

🔴 BREAKING
World Homeopathy Day :बीबी ग्रामीण रुग्णालयात जागतिक होमिओपॅथी दिन उत्साहात साजरा Mahatma Phule Jayanti : डोणगावात रक्तदान करून महात्मा फुले जयंती साजरी Accused who murdered :सासू- मेहुणीची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; मंगरुळपीर सत्र न्यायालयाचा निकाल Employee Assaulted :बसस्थानकातील सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण;एकाविरुध्द गुन्हा दाखल MLA Manoj Kayande :देऊळगाव राजातील जलकुंभाचे आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते लोकार्पण Tipper Transporting :सिने स्टाईल पाठलाग करून अवैध रेती वाहतूक करणारे  टिप्पर पकडले World Homeopathy Day :बीबी ग्रामीण रुग्णालयात जागतिक होमिओपॅथी दिन उत्साहात साजरा Mahatma Phule Jayanti : डोणगावात रक्तदान करून महात्मा फुले जयंती साजरी Accused who murdered :सासू- मेहुणीची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; मंगरुळपीर सत्र न्यायालयाचा निकाल Employee Assaulted :बसस्थानकातील सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण;एकाविरुध्द गुन्हा दाखल MLA Manoj Kayande :देऊळगाव राजातील जलकुंभाचे आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते लोकार्पण Tipper Transporting :सिने स्टाईल पाठलाग करून अवैध रेती वाहतूक करणारे  टिप्पर पकडले

  Amol Gaikwad :युवकांनी थोर महापुरुषाचे विचार आचरणात आणावे –  अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड  

Amol Gaikwad : समाजातील प्रत्येक घटकातील विशेषतः युवकांनी थोर महापुरुषांच्या जयंती साजरा करत असताना होऊन गेलेल्या थोर महापुरुषांनी मांडलेले विचार आणि त्यांची जीवनशैली प्रत्यक्ष आचरणात आणल्यास स्वतःचे जीवन तसेच येणारा काळ हा त्यांच्यासाठी लाभदायी असेल असे उद्गार बुलढाणा जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी सांगितले.

Amol Gaikwad

देऊळगाव राजा येथे शांतता समितीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा

 देऊळगाव राजा : समाजातील प्रत्येक घटकातील विशेषतः युवकांनी थोर महापुरुषांच्या जयंती साजरा करत असताना होऊन गेलेल्या थोर महापुरुषांनी मांडलेले विचार आणि त्यांची जीवनशैली प्रत्यक्ष आचरणात आणल्यास स्वतःचे जीवन तसेच येणारा काळ हा त्यांच्यासाठी लाभदायी असेल असे उद्गार बुलढाणा जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी सांगितले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, तसेच महात्मा ज्योतिबा फुले  यांचा जयंती उत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने शहरातील शांतता समिती सदस्यांची बैठक आज दिनांक 11 एप्रिलला येथील नगरपरिषद सभागृहात आयोजन करण्यात आले होते. अपर  पोलीस अधीक्षक गायकवाड यांनी अतिशय मार्मिक अशा शब्दशैलीमध्ये शांतता समिती सदस्यांना मार्गदर्शन केले. जयंती उत्सव साजरा करत असताना युवा वर्गाकडून नेहमी डीजे सारख्या वाद्याची मागणी केल्या जाते. परंतु यावर   सर्वोच्च न्यायालयाने डीजे वाजवत असताना काही नियमावली घालून दिलेली आहे  याचे आपण काटेकोरपणे पालन केले पाहिजे. अवास्तव  वाद्याची मागणी न करता थोर महापुरुषांचे विचार पोवाडे, गाणी, गवळणी आणि इतर वाद्य वाजवून प्रखरपणे महापुरुषांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावे मनुष्य जीवन जगत असताना या विचारांचा  त्याला अवश्य फायदा होईल असे उद्गार अमोल गायकवाड यांनी देऊळगाव राजा येथे शांतता समिती सदस्य यांना मार्गदर्शन करताना काढले.यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांनी सुद्धा उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करताना महापुरुषांचे उत्सव साजरे करत असताना शांततेच्या मार्गाने मिरवणूक,सभा, आणि इतर कार्यक्रम साजरे करावे जेणेकरून आपल्यापासून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे सुद्धा गरजेचे असल्याचे मनीषा कदम यांनी सांगितले. यावेळी प्रामुख्याने पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, शहराच्या नगराध्यक्षा माधुरी ताई  शिपने, उपाध्यक्ष वनिताताई भुतडा, पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी, सिंदखेड राजाचे पोलीस निरीक्षक आशिष  इंगळे, अंढेरा  पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे, किनगाव राजाचे ठाणेदार  सह विभागातील पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्या शांतता कमिटीचे सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top