Mahabreaking

[breaking_news]

Employee Assaulted :बसस्थानकातील सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण;एकाविरुध्द गुन्हा दाखल

Employee Assaulted : शहरातील बसस्थानक परिसरात सरकारी कामकाजात अडथळा आणत कर्मचाऱ्याला मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची  घटना शनिवारी (दि. ११ एप्रिल) घडली. या प्रकरणी सिंदखेडराजा येथील एका टाटा मॅजिक चालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Employee Assaulted

देऊळगाव राजा : शहरातील बसस्थानक परिसरात सरकारी कामकाजात अडथळा आणत कर्मचाऱ्याला मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची  घटना शनिवारी (दि. ११ एप्रिल) घडली. या प्रकरणी सिंदखेडराजा येथील एका टाटा मॅजिक चालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर प्रल्हाद खरात (वय ५४, रा. बोराखेडी बावरा, ता. देऊळगाव राजा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी अक्षय तोडे (रा. सिंदखेडराजा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी आरोपी अक्षय तोडे हा त्याची प्रवासी वाहतूक करणारी टाटा मॅजिक गाडी बसस्थानकात आणून तेथील प्रवाशांना आपल्या वाहनात बसवत होता. यावेळी बसस्थानकातील कर्तव्यावर असलेल्या फिर्यादी प्रभाकर खरात यांनी त्यास याबाबत हटकले.  फिर्यादीनुसार, याचा राग मनात धरून आरोपी थेट बसस्थानकातील चौकशी कक्षात घुसला आणि प्रभाकर खरात यांचा शर्ट ओढून त्यांना चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता अश्लील शिवीगाळ करत, “रस्त्याने जाताना एखाद्या दिवशी गाडीखाली उडवून मारून टाकीन,” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेमुळे बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे फिर्यादी हे सरकारी कर्तव्य बजावत असताना आरोपीने त्यांच्या कामात अडथळा निर्माण केल्याने प्रकरण अधिक गंभीर मानले जात आहे. या प्रकारामुळे फिर्यादीच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी आरोपी अक्षय तोडे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top