Mahabreaking

[breaking_news]

World Homeopathy Day :बीबी ग्रामीण रुग्णालयात जागतिक होमिओपॅथी दिन उत्साहात साजरा

World Homeopathy Day : बीबी येथे ग्रामीण रुग्णालयात दरवर्षी  १० एप्रिल रोजी सर सम्युएल हनेमन यांच्या जयंती निमित्त जागतिक होमिओपॅथी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

World Homeopathy Day

 बिबी : बीबी येथे ग्रामीण रुग्णालयात दरवर्षी  १० एप्रिल रोजी सर सम्युएल हनेमन यांच्या जयंती निमित्त जागतिक होमिओपॅथी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीचा अधिकाधिक प्रचार व प्रसार होण्यासाठी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार ग्रामीण रुग्णालय बिबी येथे  १० एप्रिल  रोजी जागतिक होमिओपॅथी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. समाधान मुळे, डॉ स्वप्निल सोनुने, डॉ. शरद कुहीटे, डॉ. विवेक बंगाळे (होमियोपैथिक वैद्यकीय अधिकारी,) डॉ. विशाल इंगोले (आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी), डॉ.आमेना शेख (युनानी वैद्यकीय अधिकारी)  आदी उपस्थित होते.  शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी या थीम सह ह्यावर्षी साजरा करण्यात आलेल्या जागतिक होमिओपॅथी दिवसाबाबतचे प्रास्ताविक आयुष वैद्यकीय अधिकारी अधिकारी  ह्यांनी उपस्थितांना सांगितले तर होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीचे महत्व डॉ. विवेक बंगाळे यांनी विषद केले.

आयुष विभागाद्वारे गरजु रुग्णावर उपचार करण्यात आले, कार्यक्रम यशस्वितेसाठी अधिपरीचारीका श्रीमती  शिंपणे,शिंदे,पडघान,गोंड,श्री घोडके,  ठाकरे , औषध निर्माण अधिकारी   आंधळे ,   खंडागळे,   पंधे,  चव्हाण, वरिष्ठ लिपिक   सोनुने, प्रयोगशाळा तंत्रज्ञ   नागरे,समुपदेशक  शेगोकार,  चव्हाण ,खरात , आरमाळ, श्रीमती ढंढोरे, श्रीमती चावरे आदि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top