Mahabreaking

[breaking_news]

Youth Seriously Injured :धावत्या ट्रॅक्टरवरून पडून युवक ठार ; मलकापूर पांग्रा येथील घटना

Youth Seriously Injured :धावत्या ट्रॅक्टरवर उभ्या असलेल्या युवकाचा तोल जाऊन तो थेट चाकाखाली सापडल्याची धक्कादायक घटना मलकापूर पांग्रा येथे घडली. या भीषण अपघातात युवक ठार झाला असून, अपघातानंतर सहकाऱ्यांनी वेळेत मदत न केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Youth Seriously Injured

फकीरा पठाण

मलकापूर पांग्रा : धावत्या ट्रॅक्टरवर उभ्या असलेल्या युवकाचा तोल जाऊन तो थेट चाकाखाली सापडल्याची धक्कादायक घटना मलकापूर पांग्रा येथे घडली. या भीषण अपघातात युवक ठार झाला अरहे.

माहितीनुसार, भुमराळा येथील विनानंबर नवीन फार्मट्रॅक कंपनीचा ट्रॅक्टर पेन सांगवीकडे जात असताना पंडित नेहरू विद्यालयासमोरील पुलाजवळ ही घटना घडली. ट्रॅक्टर चालकाच्या बाजूला उभा असलेला समाधान दळवी (वय अंदाजे ३५, रा. भुमराळा) याचा अचानक तोल गेला आणि तो मधल्या टायरखाली सापडत फरफटत गेला. या भीषण घटनेत समाधान दळवी गंभीर जखमी झाला. जखमीला उशिरा बीबी येथे उपचारासाठी हलविण्यात आले.डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.   या प्रकरणी  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top