Mahabreaking

[breaking_news]

Gutkha and Mawa sold openly : स्वस्त नशेच्या विळख्यात तरुणाई; गुटखा-मावा मोकळेपणाने विक्री, कारवाईचा फक्त गाजावाजा?

Gutkha and Mawa sold openly : शहरासह ग्रामीण भागात स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या गुटखा, मावा, सिगारेट, अवैध दारू आणि इतर नशेच्या पदार्थांमुळे तरुणाई व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता नागरिक आणि पालक व्यक्त करत आहेत. ज्या वयात शिक्षण आणि करिअर घडविण्याची गरज आहे, त्या वयात अनेक युवक व्यसनाधीन होत असल्याचे चित्र दिसत असून, यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात संबंधित यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

Gutkha and Mawa sold openly

 एफडीएची कारवाई कागदावरच?; गुटखा, मावा, गांजा सहज उपलब्ध, पालकांमध्ये तीव्र चिंता

गजानन तिडके

देऊळगाव राजा : शहरासह ग्रामीण भागात स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या गुटखा, मावा, सिगारेट, अवैध दारू आणि इतर नशेच्या पदार्थांमुळे तरुणाई व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता नागरिक आणि पालक व्यक्त करत आहेत. ज्या वयात शिक्षण आणि करिअर घडविण्याची गरज आहे, त्या वयात अनेक युवक व्यसनाधीन होत असल्याचे चित्र दिसत असून, यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात संबंधित यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

शहरातील पानटपऱ्या, किराणा दुकाने, चहाच्या टपऱ्या आणि काही छोट्या दुकानांमध्ये बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी कारवाई झाल्यानंतरही दुसऱ्याच दिवशी पुन्हा विक्री सुरू होत असल्याचा दावा स्थानिक नागरिक करीत आहेत. त्यामुळे कारवाईचा धाक कितपत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कारवाईचा गाजावाजा; परिणाम मात्र मर्यादित?

अन्न व औषध प्रशासन (एफडीए), राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि इतर संबंधित यंत्रणा वेळोवेळी कारवाई करत असल्याचा दावा करतात. मात्र, प्रत्यक्षात नशेच्या पदार्थांची उपलब्धता कमी झाल्याचे चित्र दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी पोलीस विभागाकडून सातत्याने कारवाई होत असली तरी इतर विभागांकडून समन्वयाने आणि सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याची टीका केली जात आहे.

ऑनलाइन पुरवठ्याचीही चर्चा

स्थानिक स्तरावर अशीही चर्चा आहे की, काही विक्रेते दुकानातून उघडपणे विक्री न करता मोबाईल कॉल किंवा व्हॉट्सअॅपद्वारे ऑर्डर स्वीकारून ग्राहकांपर्यंत नशेचे पदार्थ पोहोचवत आहेत. मात्र, या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अशा प्रकारच्या व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पालकांमध्ये वाढती चिंता

स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या नशेच्या पदार्थांमुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याची भीती पालक व्यक्त करीत आहेत. व्यसनाधीनतेमुळे शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

देऊळगाव महीबाबत चर्चांना उधाण

स्थानिक स्तरावर देऊळगाव मही परिसरातून गुटख्याचा अवैध पुरवठा होत असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. गत महिन्यात अन्न व औषध प्रशासनाने एका प्रकरणात कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर अवैध पुरवठा करणाऱ्या साखळ्यांवर व्यापक कारवाई झाली का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या संदर्भातील दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांचे आवाहन

याबाबत पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी म्हणाले, “पोलीस विभाग अवैध गुटखा, अवैध दारू तसेच इतर बेकायदेशीर नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध सातत्याने कारवाई करत आहे. नागरिक आणि पालकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top