Mahabreaking

[breaking_news]

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आमदार मनोज कायंदे आक्रमक

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघातील देऊळगाव राजा व सिंदखेडराजा या दोन्ही प्रमुख शहरांचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास करणे हे आपले स्वप्न असल्याचे स्पष्ट करत युवा आमदार मनोज कायंदे यांनी विधानसभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर सभागृहाचे लक्ष वेधले. मतदारसंघातील सांस्कृतिक, सामाजिक, कृषी व नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी शासन दरबारी ठोस आणि आग्रही मागण्या मांडल्या.

MLA Manoj Kayande
सांस्कृतिक भवन, कृषी समृद्धी नवनगर, पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी विधानसभेत शासनाचे लक्ष वेधले

गजानन तिडके

देऊळगाव राजा : सिंदखेड राजा मतदारसंघातील देऊळगाव राजा व सिंदखेडराजा या दोन्ही प्रमुख शहरांचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास करणे हे आपले स्वप्न असल्याचे स्पष्ट करत युवा आमदार मनोज कायंदे यांनी विधानसभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर सभागृहाचे लक्ष वेधले. मतदारसंघातील सांस्कृतिक, सामाजिक, कृषी व नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी शासन दरबारी ठोस आणि आग्रही मागण्या मांडल्या.

युवा आमदार मनोज कायंदे यांनी देऊळगाव राजा व सिंदखेडराजा शहरात क्रांतिसूर्य महात्मा फुले नाट्यगृह उभारणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यासोबतच दोन्ही शहरांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनडॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी भरीव निधी मंजूर करण्यात यावा, अशीही ठाम भूमिका त्यांनी मांडली.

या सांस्कृतिक भवनांच्या उभारणीमुळे सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांना मोठी चालना मिळेल. युवकांसाठी कला, साहित्य व सांस्कृतिक अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध होऊन शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास आमदार कायंदे यांनी व्यक्त केला.

तसेच सिंदखेड राजा कृषी समृद्धी नवनगर प्रकल्पासंदर्भात आमदार कायंदे यांनी विधानसभेत विशेष बाब उपस्थित केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंदखेड राजा कृषी समृद्धी नवनगर उपसमितीची तातडीने बैठक घेऊन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. MIDCच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून, शेतकऱ्यांच्या कृषीमालावर प्रक्रिया करून त्यांना सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासोबतच संपूर्ण भागाचा आर्थिक व सामाजिक विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, सिंदखेड राजा व देऊळगाव राजा शहरांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याकडेही आमदार मनोज कायंदे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. सध्या दोन्ही शहरांमध्ये १५ ते २० दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी साठवणूक, घरगुती गरजा तसेच आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असल्याने शहरातील नळ पाणीपुरवठा योजना नियमित व सुरळीत करण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली.

यासोबतच झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या स्वच्छता व आरोग्याच्या समस्या याबाबतही आमदार कायंदे यांनी चिंता व्यक्त केली. अपुऱ्या भूमिगत गटार योजना व अर्धवट राहिलेली विकासकामे यामुळे नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता व विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सिंदखेड राजा व देऊळगाव राजा शहरांसाठी सुंदर, स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी स्वच्छ रस्ते, भूमिगत गटारे, क्रीडांगणे, जॉगिंग ट्रॅक आदी सुविधांसाठी शासनाने तातडीने पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.

एकूणच सांस्कृतिक विकासापासून कृषी, पाणीपुरवठा व नागरी स्वच्छतेपर्यंत सर्व मुद्द्यांवर युवा आमदार मनोज कायंदे यांनी प्रभावीपणे भूमिका मांडत सिंदखेड राजा मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी आपली ठाम बांधिलकी अधोरेखित केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top