Mahabreaking

🔴 BREAKING
Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

election duty :निवडणूक ड्युटीतही जोपासले विद्यार्थी व शेतकरी हित!

election duty : येथील नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महसूलसह विविध प्रशासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवडणूक ड्युटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली. यादरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीत महसूल विभागाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनस्तरावरून प्राप्त झालेल्या तालुकानिहाय अनुदानाची रक्कम पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. याच काळात रब्बी बियाणे खरेदीसाठीचे अनुदान वाटपही करण्यात आले. 

election duty
शासकीय सुट्टीच्या दिवशी बार्शीटाकळीत महसूल विभागाची कामकाज मोहीम

बबन इंगळे

बार्शीटाकळी : येथील नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महसूलसह विविध प्रशासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवडणूक ड्युटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली. यादरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीत महसूल विभागाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनस्तरावरून प्राप्त झालेल्या तालुकानिहाय अनुदानाची रक्कम पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. याच काळात रब्बी बियाणे खरेदीसाठीचे अनुदान वाटपही करण्यात आले.

हे सर्व काम रीतसर व नियमानुसार करत असताना महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागली. इतकेच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांचे आधार अपडेट किंवा बँक खात्यांतील तांत्रिक अडचणींमुळे मदत व अनुदान वाटप रखडले होते, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी बार्शीटाकळी तहसील कार्यालयातील काही महसूल अधिकारी व कर्मचारी निवडणूक ड्युटीवर असतानाही अतिरिक्त वेळेत व शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत काम करताना दिसून आले.

दरम्यान, विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कामांसाठी तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध पदभरतींसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी विहित मुदतीत आवश्यक असलेली जात प्रमाणपत्रे, नॉन-क्रिमीलेअर, वय व अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, स्वाधार तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी लागणारी विविध प्रतिज्ञापत्रे आदी शैक्षणिक दस्तऐवज व ऑनलाइन डिजिटल प्रमाणपत्रे मिळावीत, यासाठी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार आपार यांच्या मार्गदर्शक सूचना व आदेशानुसार तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश वझिरे यांच्या देखरेखीखाली महसूल विभागाने विशेष कामकाज केले.

या कामकाजात निवासी नायब तहसीलदार अतुल सोनवणे, महसूल नायब तहसीलदार अक्षय नागे, संज्ञान विभागाचे नायब तहसीलदार नितीन म्हात्रे, सेतू विभागाच्या महसूल सहाय्यक भाग्यश्री चौधरी, अभिलेख विभागाचे महसूल सहाय्यक सुशांत आठवले, सहाय्यक महसूल अधिकारी कैलास ढोरे, आसावरी बोरकर, अलका भांडे, वंदना वानखडे, कैलास शेगोकार, महसूल सेवक पंकज भातकर आदींनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी व शेतकऱ्यांच्या समस्या समजून समन्वयाने कामकाज पाहिले. तसेच मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयीन स्तरावर गणेश राऊत यांनी जबाबदारी सांभाळली.

विशेष बाब म्हणजे निवासी नायब तहसीलदार अतुल सोनवणे यांनी विविध महसूल अभिलेखांवर स्वाक्षऱ्या तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रांवर डिजिटल स्वाक्षरीचे कामकाज निवडणूक ड्युटी असलेल्या ठिकाणावरूनच प्रभावीपणे पार पाडले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top