Mahabreaking

[breaking_news]

Yoga Day celebrated :देऊळगाव राजात उत्साहात योग दिन साजरा; विविध संस्था, महाविद्यालयात उस्फुर्त प्रतिसाद

Yoga Day celebrated :आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देऊळगाव राजा शहरात विविध धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या वतीने योग शिबिरे, प्रात्यक्षिके आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. योगाचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमांना नागरिक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Yoga Day celebrated

‘योगातून निरोगी जीवनाचा संदेश’; देऊळगाव राजात ठिकठिकाणी योग दिन कार्यक्रम

गजानन तिडके

देऊळगाव राजा : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देऊळगाव राजा शहरात विविध धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या वतीने योग शिबिरे, प्रात्यक्षिके आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. योगाचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमांना नागरिक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

स्थानिक श्रीसंत नरहरिनाथ महाराज संस्थान येथे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, डॉक्टर असोसिएशन, राजस्थानी महिला मंडळ, पतंजली परिवार आणि जायंट्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प.पू. श्री. मोहननाथ महाराज पैठणकर तसेच आमदार मनोज कायंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अकोला येथील डॉ. अंशू गिनोडे यांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद केले. कार्यक्रमास विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, भाविक, महर्षी वसिष्ठ वेद विद्यालय आणि श्रीसंत तुकाराम महाराज वारकरी विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

yog day

दरम्यान, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, देऊळगाव राजा येथेही जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. केंद्र प्रमुख सुनंदा दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योग शिक्षक गोविंदराव अहिरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड व देवकला दिदी उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांनी नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी, मन प्रसन्न आणि जीवन संतुलित राहते, असे प्रतिपादन केले. गोविंदराव अहिरे यांनी विविध योगासने व प्राणायामांचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले.

yog day

तसेच श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एकदिवसीय योग, प्राणायाम व ध्यान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे अध्यक्षस्थानी होते. क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. किरण मोगरकर यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रशिक्षण दिले. एनसीसी, एनएसएस आणि क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि एनसीसी कॅडेट्स मोठ्या संख्येने सहभागी झाले.

योग दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांतून ‘नियमित योग, निरोगी जीवन’ हा संदेश देण्यात आला. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top