Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर

World Buddhist Conference: जागतिक बौद्ध धम्म परिषद २२ नोव्हेंबरला बुलढाण्यात

World Buddhist Conference: गेल्या वर्षी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर बुलढाणा शहरात यावर्षीदेखील प्रबुद्ध भारत घडविण्यासाठी जागतिक स्तरावरील भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत मूकनायक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांनी २२ नोव्हेंबर २०२५ ला जागतिक बौद्ध धम्म परिषद आयोजित केली आहे.

World Buddhist Conference

बौद्ध धम्मगुरु ज्ञानज्योती महाथेरोंसह भिक्खू संघाची उपस्थिती : मूकनायक फाउंडेशनचे आयोजन

बुलढाणा : गेल्या वर्षी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर बुलढाणा शहरात यावर्षीदेखील प्रबुद्ध भारत घडविण्यासाठी जागतिक स्तरावरील भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत मूकनायक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांनी २२ नोव्हेंबर २०२५ ला जागतिक बौद्ध धम्म परिषद आयोजित केली आहे.
जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरु पूज्य भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांच्यासह भन्ते उदितज्ञान थेरो, भन्ते ज्ञानरक्षित थेरो, भन्ते यश थेरो, भन्ते धम्मसेन थेरो, भन्ते पुण्ण, भन्ते वेण धम्म चेती, भन्ते गुणानंद अभिभू यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच अशी दिवसभर ही परिषद चालणार आहे. २२ नोव्हेंबरला सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत नगर परिक्रमा काढली जाणार आहे. साडेनऊ वाजता धम्म ध्वजोराहण, पंचशील ग्रहण व बुद्धवंदना झाल्यानंतर पुरस्कार समारंभ, भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन व बळकटीकरण, युवकांसाठी बौद्ध धर्मावरील विशेष सत्र यावर धम्मदेसना दिली जाईल. दुपारी पावणेतीन वाजता ध्यान साधना होईल. दुपारी साडेतीन वाजेनंतर बौद्ध धम्माची शिकवणूक यावर धम्मदेसना दिली जाईल. सायंकाळी सव्वाचार वाजता महापरित्राणपाठ, सायंकाळी साडेचार वाजता पुण्यानुमोदन आणि समारोप असे कार्यक्रम पार पडतील.
भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, भीम आर्मी (भारत एकता मिशन), महार रेजिमेंट, बुद्धिस्ट टिचर्स असोसिएशन, कास्ट्राईब संघटना यांच्यासह धम्म उपासकांच्या सहकार्याने ही परिषद घेण्यात येत आहे. धम्म परिषदेला राज्यभरातून हजारोंच्या संख्येने धम्म उपासक उपस्थित राहणार आहेत.

World Buddhist Conference
तरुणांसाठी बिझनेस एक्स्पो

नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बिझनेस एक्स्पोदेखील आयोजित केला आहे. या परिषदेत विविध क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांना संधी मिळणार आहे. ज्यामुळे त्यांना नवीन व्यवसायिक संधी शोधणे, नवनिर्मितीला चालना देणे शक्य होणार असल्याचे आयोजक सतीश पवार यांनी सांगितले.

मूकनायक फाउंडेशन पुरस्काराचे वितरण

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रतिभावंतांचा धम्म परिषदेत मूकनायक फाउंडेशन बुलढाणा हा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळाही भिक्खू संघाच्या हस्ते होईल. धम्म परिषदेत बुद्धिस्ट स्कूल निर्माणाचा संकल्प समोराहसुद्धा पार पडणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top