Mahabreaking

🔴 BREAKING
first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

Savargaon were shocked!: सावरगाव डुकरें हादरलं! मुलानेच कुर्‍हाडीने केली आई-वडिलांची निर्दयी हत्या; त्यानंतर घेतला स्वतःचाही जीव!

Savargaon were shocked!: आई वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्यानंतर मुलाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावात घडली. ५ नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

Savargaon
चिखली तालुक्यातील थरकाप उडवणारी घटना

चिखली : आई वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्यानंतर मुलाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना
चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावात घडली. ५ नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
या दुर्दैवी घटनेत वडील सुभाष डीगंबर डुकरे (७५), आई लता सुभाष डुकरे (६५) आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे (४२) या तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सावरगाव डुकरे गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये भीती आणि दुःखाचे वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले असून संपूर्ण घर सील करण्यात आले आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहांना चिखली उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी हलवले आहे.या हत्याकांडामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कौटुंबिक वाद की मानसिक नैराश्य, यावरून पोलिस तपास सुरू आहे. दरम्यान, घटनेनंतर परिसरात हळहळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तसेच ठाणेदार भूषण गावंडे यांनी भेट देऊन तपासाची पाहणी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top