Mahabreaking

[breaking_news]

Workshop : गुरू तेगबहादूर सिंग यांच्या ३५० व्या बलिदान दिनानिमित्त जानेफळ येथे कार्यशाळा उत्साहात

Workshop :  धर्मस्वातंत्र्य, धार्मिक सहिष्णुता आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेगबहादूर सिंग यांच्या ३५० व्या बलिदान दिनानिमित्त शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी श्री सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जानेफळ येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत श्री शिवाजी हायस्कूल, जानेफळसह विविध शाळांतील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Workshop

श्री शिवाजी हायस्कूलसह २५० विद्यार्थ्यांचा सहभाग; निबंध, चित्रकला व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन

हिवराखुर्द : धर्मस्वातंत्र्य, धार्मिक सहिष्णुता आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेगबहादूर सिंग यांच्या ३५० व्या बलिदान दिनानिमित्त शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी श्री सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जानेफळ येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत श्री शिवाजी हायस्कूल, जानेफळसह विविध शाळांतील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यशाळेचे उद्घाटन श्री सरस्वती शिक्षण समितीच्या संचालिका किरणताई चांदणे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख वक्ते संतोष सिंग मो. जाट यांनी गुरू तेगबहादूर सिंग यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी त्यांनी केलेला त्याग संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या विचारांतून विद्यार्थ्यांनी सहिष्णुता, बंधुभाव आणि मानवतेची शिकवण घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल यांचा संदेश व्हिडिओ क्लिपद्वारे विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा सीसीआरटीचे जिल्हा स्रोत व्यक्ती प्रा. डॉ. शिवाजी गोविंदराव म्हस्के यांनी केले.

विविध स्पर्धांतून विद्यार्थ्यांनी जाणून घेतले गुरूंचे जीवनकार्य

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात गुरू तेगबहादूर सिंग यांच्या जीवनकार्यावर आधारित निबंधलेखन, चित्रकला आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. निबंध स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. चित्रकला स्पर्धेत उत्कृष्ट चित्रे सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

याशिवाय गुरू तेगबहादूर सिंग यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रप्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी भेट देऊन त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग, धर्मस्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यागाची प्रेरणादायी गाथा जाणून घेतली. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना उपस्थिती प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती; शिक्षकांचे विशेष परिश्रम

या कार्यशाळेला प्राचार्य रामदास धामोडकर, प्रा. रमेश नालेगावकर, देवानंद शिंदे, गजानन शिंदे, सागर अंभोरे, डॉ. नंदकिशोर बोकाडे, संतोष सिंग मो. जाट, मंजित कौर स. जाट यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य रामदास धामोडकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बक्षीस वितरण डी. आर. शिंदे व जी. एस. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

समारोपीय भाषणात प्रा. डॉ. शिवाजी गोविंदराव म्हस्के यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणारे अध्यापक, विद्यार्थी आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे डी. आर. शिंदे यांनी आभार मानले.

कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी समर्थ बोराडे, गौरव फोलाने, सागर आल्हाट, सागर अंभोरे, शिलगे सर, गाडेकर सर, गवळी सर आणि देशमुख सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांना अल्पोपाहार देण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top