Mahabreaking

🔴 BREAKING
Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती

Deputy Tehsildar :गटांच्या माध्यमातून महिला सक्षम बनतील – नायब तहसीलदार प्रांजल पवार

Deputy Tehsildar : महिला घरकामासोबत नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरही काम करत असतात. ही दुहेरी जबाबदारी समर्थपणे सांभाळताना त्या कधीही डगमगत नाहीत. बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व व्यवसाय उभारून अनेक महिलांनी आपली आर्थिक स्थिती भक्कम केली आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून निश्चितच सक्षम बनतील, असा विश्वास निवासी नायब तहसीलदार कु. प्रांजल पवार यांनी व्यक्त केला.

Deputy Tehsildar

पुरुषांच्या बरोबरीने महिलाही तितक्याच सक्षम – डॉ. भाग्यश्री खेडेकर

साखरखेर्डा : महिला घरकामासोबत नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरही काम करत असतात. ही दुहेरी जबाबदारी समर्थपणे सांभाळताना त्या कधीही डगमगत नाहीत. बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व व्यवसाय उभारून अनेक महिलांनी आपली आर्थिक स्थिती भक्कम केली आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून निश्चितच सक्षम बनतील, असा विश्वास निवासी नायब तहसीलदार कु. प्रांजल पवार यांनी व्यक्त केला.

दि. २७ जानेवारी रोजी साखरखेर्डा येथील आशीर्वाद लॉन येथे महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा बुलढाणा व नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत लोकसंचलित साधन केंद्र, साखरखेर्डा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण अंतर्गत ‘सुधारक सन्मान पुरस्कार सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. महिलांना सहकार्य करून त्यांना सक्षम बनविणाऱ्या पुरुषांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंदखेडराजा नायब तहसीलदार कु. प्रांजल पवार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भाग्यश्री श्रीनिवास खेडेकर, लोणार पंचायत समितीच्या माजी सभापती तथा ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई इंगळे, साखरखेर्डा सरपंच ज्योती जाधव, गीताताई संदीप मगर, सौ. रेखा रामभाऊ जाधव, बचत गट अध्यक्ष कमलबाई जाधव, शिंदी येथील पोलीस पाटील वैशालीताई हाडे, साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे, माजी सरपंच कमलाकर गवई, सुमेध गवई आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रास्ताविक व्यवस्थापक आशा शरद सरकटे यांनी केले. त्यांनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते २५ जणांना ‘सुधारक सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यात गणेश गवई, प्रदीप खरात, नितीन कंकाळ, सोहम गवई, विनोद सौभागे, भीमराव काळे, विशाल गवई, विशाल मंडळकर, शिवाजी खरात, सत्यनारायण काळुसे, प्रदीप जाधव, सुनील तांगडे, गजानन सांगळे, प्रल्हाद गवई, विजय भालेकर, राजेंद्र देशमुख, शिवाजी ठोसरे, अमोल गवई, जयसिंग चव्हाण, संजय जाधव, प्रशांत साळवे यांचा समावेश होता.

मार्गदर्शन करताना डॉ. भाग्यश्री खेडेकर म्हणाल्या की, आज महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिला आपली कामे अत्यंत सक्षमपणे पार पाडत आहेत. महिलांच्या प्रगतीसाठी पुरुषांचे सहकार्य महत्त्वाचे असून, महिलांच्या कार्यक्रमात पुरुषांचा सन्मान होणे ही खरी महिला सक्षमीकरणाची सुरुवात आहे.

वर्षाताई इंगळे यांनी महिलांची कार्यक्षमता व बारकाईने काम करण्याची वृत्ती अधोरेखित केली, तर सरपंच ज्योती जाधव यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात पत्रकार अशोक इंगळे, सचिन खंडारे, समाधान सरकटे, देविदास सरकटे, डी. एन. पंचाळ यांचाही आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या कळगे यांनी केले तर आभार प्रदर्शन गोदावरी इंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रेखा पवार, आशाताई राजगुरू, आशा राजेगावकर, कमल परांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top