Mahabreaking

[breaking_news]

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बिबी येथे सामूहिक श्रद्धांजली; दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने ठेवली बंद

Ajit Pawar : महाराष्ट्र राज्याचे निर्भीड व स्पष्टवक्ते उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या अपघाती निधनाची दुःखद वार्ता आज बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी सकाळी सुमारे १० वाजता समजताच बीबी गावावर शोककळा पसरली. अजित दादांना श्रद्धांजली म्हणून बीबी वासीयांनी आपली सर्व प्रकारची दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून दुःखवटा व्यक्त केला.

Ajit Pawar

रमेश खंडागळे

बीबी  : महाराष्ट्र राज्याचे निर्भीड व स्पष्टवक्ते उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या अपघाती निधनाची दुःखद वार्ता आज बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी सकाळी सुमारे १० वाजता समजताच बीबी गावावर शोककळा पसरली. अजित दादांना श्रद्धांजली म्हणून बीबी वासीयांनी आपली सर्व प्रकारची दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून दुःखवटा व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ जानेवारी रोजी बारामतीजवळील एका गावात लँडिंगदरम्यान त्यांच्या विमानाला अपघात होऊन स्फोट झाला. या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. ही वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आणि काही क्षणांतच लोणार तालुक्यातील बीबी गावातही येऊन धडकली.

घटनेचे वृत्त समजताच गावात एकच शोकमय वातावरण निर्माण झाले. अजित पवार यांचे कार्य, स्पष्ट भूमिका आणि निर्भीड नेतृत्व आठवून अनेक कार्यकर्ते व नागरिक अक्षरशः धायमोकलून रडू लागले. त्यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीने संपूर्ण समाजमन हेलावून गेले. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर बीबी गावात दिवसभर स्मशान शांतता पसरली होती. सर्व दुकाने, व्यापारी आस्थापना बंद ठेवून ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातील एक खंबीर नेतृत्व हरपल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top