Mahabreaking

[breaking_news]

Woman Assaulted :महिलेला मारहाण, विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ; आरोपीविरोधात अॅट्रॉसिटीसह गुन्हा दाखल

Woman Assaulted :तालुक्यातील गारगुंडी येथे मोबाईलवरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याचा तसेच जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Woman Assaulted

देऊळगाव राजा : तालुक्यातील गारगुंडी येथे मोबाईलवरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याचा तसेच जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 33 वर्षीय महिलेने देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या मजुरी व्यवसाय करीत असून सिनगाव जहाँगीर येथील रहिवासी आहेत.फिर्यादीनुसार, १६ मे २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गारगुंडी येथे संबंधित व्यक्तीने मोबाईलवर शिवीगाळ का केली, याबाबत विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर वाद निर्माण झाला. यावेळी आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेल्या केशव जगन काकड यांनी हातातील काठीने फिर्यादीच्या डाव्या दंडावर व पाठीवर मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्या साडीचा पदर ओढून विनयभंग केल्याचा आणि जातीवाचक शब्दांचा वापर करून अपमानास्पद वक्तव्य केल्याचाही आरोप आहे. याशिवाय धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील मारहाण, धमकी, अपमान आणि महिलेशी गैरवर्तनासंदर्भातील कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर गुन्ह्याची नोंद पोलीस कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात आली असून पुढील तपास प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top