Mahabreaking

[breaking_news]

Will Kim Jong Un :किम जोंग उन यांची मुलगी ‘उत्तराधिकारी’ ठरणार? दक्षिण कोरियन गुप्तचर संस्थेचा दावा

Will Kim Jong Un : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी आपल्या १३ वर्षीय मुलगी किम जू ऐ हिला संभाव्य उत्तराधिकारी म्हणून निवडल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणेने केला आहे. गुरुवारी खासदारांना दिलेल्या माहितीत हा अंदाज व्यक्त करण्यात आला.

Will Kim Jong Un

सेऊल : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी आपल्या १३ वर्षीय मुलगी किम जू ऐ हिला संभाव्य उत्तराधिकारी म्हणून निवडल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणेने केला आहे. गुरुवारी खासदारांना दिलेल्या माहितीत हा अंदाज व्यक्त करण्यात आला.

दक्षिण कोरियाची नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस (NIS) यांच्या मते, किम जू ऐ यांची वाढती सार्वजनिक उपस्थिती लक्षात घेऊन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अधिकृत कार्यक्रमांमध्ये त्यांची ठळक उपस्थिती, विविध राजकीय प्रसंगी सहभाग आणि परदेश दौऱ्यांतील उपस्थिती यांचा विचार करून हा आढावा घेण्यात आल्याचे संस्थेने स्पष्ट केले.

अलीकडील महिन्यांत किम जू ऐ या अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांत वडिलांसोबत दिसल्या आहेत. सप्टेंबरमध्ये बीजिंग दौऱ्यादरम्यानही त्या किम जोंग उन यांच्यासोबत उपस्थित होत्या. हा त्यांचा पहिला परदेश दौरा मानला जातो. तसेच त्या कोरियन पीपल्स आर्मी स्थापनेदिनीच्या कार्यक्रमात आणि कुमसुसान पॅलेस ऑफ द सन येथेही दिसल्या होत्या. दरम्यान, दक्षिण कोरियाचे खासदार ली सोंग-क्वेन यांनी सांगितले की, NIS पूर्वी किम जू ऐ या “उत्तराधिकारी होण्यासाठी प्रशिक्षण घेत आहेत” असे मानत होती; मात्र आता त्या “औपचारिक घोषणेच्या टप्प्यावर” पोहोचल्याचा संस्थेचा अंदाज आहे. लवकरच होणाऱ्या उत्तर कोरियाच्या महत्त्वाच्या पक्ष अधिवेशनाकडेही NIS लक्ष ठेवून आहे. प्योंगयांग येथे होणाऱ्या या अधिवेशनात पुढील पाच वर्षांसाठीची परराष्ट्र नीती, युद्धतयारी आणि अणुकार्यक्रमासंबंधी धोरणे जाहीर होऊ शकतात.

विशेषज्ञांच्या मते, किम जू ऐ यांना चीन दौऱ्यावर नेणे आणि परदेशात सार्वजनिकरित्या त्यांची उपस्थिती दाखवणे हे त्यांची वाढती राजकीय महत्त्वाची भूमिका दर्शवणारे संकेत आहेत. त्यामुळे भविष्यात त्या उत्तर कोरियाच्या सत्तेच्या वारसदार ठरू शकतात, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top