Mahabreaking

[breaking_news]

Wall Collapses :पिंपळगाव राजात भिंत कोसळली, दोन जणांचा मृत्यू

Wall Collapses :घराच्या तळमजल्याच्या बांधकामादरम्यान अचानक भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, २८ मे रोजी रात्री खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे घडली. अचानक घडलेल्या या घटनेने पिंपळगाव राजा गावात हळहळ व्यक्त होत आहे. मुकद्दर खान जमशद खान (वय ७४) तसेच शेख युसुफ शेख बिसमिल्ला (वय ३८), दोघेही रा. पिंपळगाव राजा अशी मृतकांची नावे आहेत.

Wall Collapses

घराच्या तळमजल्याच्या बांधकामादरम्यान घडली दुर्घटना

खामगाव : घराच्या तळमजल्याच्या बांधकामादरम्यान अचानक भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, २८ मे रोजी रात्री खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे घडली. अचानक घडलेल्या या घटनेने पिंपळगाव राजा गावात हळहळ व्यक्त होत आहे. मुकद्दर खान जमशद खान (वय ७४) तसेच शेख युसुफ शेख बिसमिल्ला (वय ३८), दोघेही रा. पिंपळगाव राजा अशी मृतकांची नावे आहेत.

पिंपळगाव राजा येथील  अहमद खान मुकद्दर खान यांच्या राहत्या घराचे तळमजल्याचे बांधकाम सुरू होते. बांधकामाच्या कामाला पाणी देण्याचे काम सुरू असताना अचानक बांधकामाची भिंत कोसळली. भिंत एवढ्या वेगाने कोसळली की तेथे   उपस्थित असलेल्या दोघांनाही स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नाही. भिंतीखाली दबून मुकद्दर खान जमशद खान   तसेच शेख युसुफ शेख बिसमिल्ला  यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार भागवत मुळीक यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मदतकार्य सुरू केले.

यानंतर दोन्ही मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालय, खामगाव येथे हलविण्यात आले. या घटनेमुळे मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः वृद्ध मुकद्दर खान यांच्या निधनामुळे गावातील ज्येष्ठ नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी खामगाव शहर पालिसांनी अकस्मिक मृत्यूंची नोंद केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top