Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Vijay’s rally stampede : तामिळ अभिनेता विजय यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी; ३६ ठार, ३० जखमी

Vijay’s rally stampede : तामिळनाडूतील करूर येथे शनिवारी संध्याकाळी अभिनेता-राजकारणी विजय यांच्या रॅलीत मोठी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ३६ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये १६ महिला, ९ पुरुष आणि ८ मुले आहेत, अशी माहिती तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एम. ए. सुब्रमण्यम यांनी दिली. या अपघातात ३० हून अधिक लोक जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Vijay's rally

वृत्तसंस्था 

करूर (तामिळनाडू): तामिळनाडूतील करूर येथे शनिवारी संध्याकाळी अभिनेता-राजकारणी विजय यांच्या रॅलीत मोठी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ३६ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये १६ महिला, ९ पुरुष आणि ८ मुले आहेत, अशी माहिती तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एम. ए. सुब्रमण्यम यांनी दिली. या अपघातात ३० हून अधिक लोक जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाच्या रॅलीसाठी प्रचंड गर्दी जमली होती. प्रशासनाने १० हजार लोकांच्या उपस्थितीला परवानगी दिली असताना, तब्बल सुमारे १ लाख २० हजार लोक रॅलीला जमल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. काही लोक बेशुद्ध पडल्याने गोंधळ उडाला. त्यातच पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर येत असून त्यामुळे धावपळ सुरू झाली. गर्दीत अडकलेल्या अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि शेकडो जण बेशुद्ध पडले.
परिस्थिती बिकट होताना पाहून विजय यांनी आपले भाषण थांबवले आणि लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जखमींना मदत करण्याचे आणि त्यांना रुग्णालयात पोहोचवण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, ९ वर्षांची एक मुलगी बेपत्ता झाल्याचीही माहिती समोर आली असून विजय यांनी मंचावरूनच पोलिस आणि कार्यकर्त्यांना तिचा शोध घेण्याचे आवाहन केले. यामुळेही काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, “करूर येथे झालेल्या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १६ महिला आणि ८ मुले आहेत. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. मी स्वतः करूर येथे जाऊन पीडित कुटुंबीयांना भेटेन व रुग्णालयात दाखल जखमींची विचारपूस करेन.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top