Mahabreaking

[breaking_news]

Cyclone ‘Ragasa’ : पूर्वेकडील आशियात ‘रागासा’ वादळाचा कहर

Cyclone ‘Ragasa’ :  र्वेकडील आशियात, विशेषतः चीन, हाँगकाँग, फिलिपिन्स आणि तैवानमध्ये ‘रागासा’ वादळाने मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. चीन आणि हाँगकाँगमध्ये उच्च सतर्कता जारी करण्यात आली असून शाळा व व्यावसायिक आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

Cyclone 'Ragasa'

बीजिंग : पूर्वेकडील आशियात, विशेषतः चीन, हाँगकाँग, फिलिपिन्स आणि तैवानमध्ये ‘रागासा’ वादळाने मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. चीन आणि हाँगकाँगमध्ये उच्च सतर्कता जारी करण्यात आली असून शाळा व व्यावसायिक आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

फिलिपिन्समध्ये या वादळामुळे दोन जणांचा मृत्यू झाला, तर तैवानमध्ये एका सरोवराच्या धरण फुटीमुळे १४ जणांचा मृत्यू आणि १८ जण जखमी झाले आहेत. अजूनही ३० जण बेपत्ता असून सुमारे २६० नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

‘टायफून रागासा’ने हाँगकाँग व दक्षिण चीनमध्ये धडक दिल्याने उच्चस्तरीय सतर्कता लागू करण्यात आली आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top