Lack of Planning in Administration :उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने 4 मे रोजी मेहकर येथे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. सकाळी 10 वाजतापासून वाहन धारक तिथे उपस्थित होते. मात्र, संबधीत अधिकारी उशीरा आल्याने वाहन धारकांचा संताप अनावर झाला. दरम्यान, नियोजित अधिकाऱ्याना मेडिकल इमर्जंन्सी आल्याने दुसरे अधिकारी पोहचायला वेळ झाल्याचे आरटीओ प्रशासनाने म्हटले आहे.

मेहकरात केले होते आयोजन : रांगेत लागलेल्या वाहन धारकांना करावी लागली प्रतीक्षा
मेहकर : उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने 4 मे रोजी मेहकर येथे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. सकाळी 10 वाजतापासून वाहन धारक तिथे उपस्थित होते. मात्र, संबधीत अधिकारी उशीरा आल्याने वाहन धारकांचा संताप अनावर झाला. दरम्यान, नियोजित अधिकाऱ्याना मेडिकल इमर्जंन्सी आल्याने दुसरे अधिकारी पोहचायला वेळ झाल्याचे आरटीओ प्रशासनाने म्हटले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना परवाना नूतनीकरण, वाहन पासिंग आदी कामांसाठी सोयीस्कर सेवा मिळावी या उद्देशाने दि. ४ मे रोजी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला प्रतिसाद देत शेकडो नागरिक सकाळपासूनच उपस्थित होते. मात्र, नियोजित वेळेनंतरही अधिकाऱ्यांचा मागमूस नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
दुपारपर्यंत एकही अधिकारी न आल्याने कॅम्पचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे दिसून आले. याशिवाय, कॅम्पस्थळी पिण्याच्या पाण्याची किंवा बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने रखरखत्या उन्हात नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. अनेकांनी कामावरून सुट्टी घेऊन आले असतानाही त्यांचा पूर्ण दिवस वाया गेल्याची भावना व्यक्त करण्यात आली.“सकाळी १० वाजल्यापासून प्रतीक्षा करत आहोत; पण दुपारी ४ वाजेपर्यंत अधिकारीच आले नसल्याचा आरोप वाहन धारकांनी आरोप केला आहे. प्रशासनाला जनतेच्या वेळेची काहीच किंमत नाही का?” असा संतप्त सवाल एका वाहनधारकाने उपस्थित केला. या घटनेमुळे स्थानिक पातळीवरील प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, जनतेच्या सुविधांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम केवळ कागदोपत्रीच राहतात का, अशी टीका होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी वाहन धारकांनी केली आहे.
नियोजीत अधिकाऱ्यांची वेळेवर मेडिकल इमर्जन्सी आली. त्यामुळे, ऐन वेळेवर दुसऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने मेहकरला जाईपर्यंत वेळ लागला. अधिकारी तिथे पोहचल्यानंतर शिबीरात आलेल्या सर्व वाहन धारकांची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच शिबीर स्थळी पिण्याचे पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली होती.
विवेक भंडारी, वाहन निरीक्षक, बुलढाणा

