Mahabreaking

[breaking_news]

Vasantrao Naik Vidyalaya :जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत वसंतराव नाईक विद्यालय, बिबीचा डंका; विभागीय स्पर्धेसाठी संघाची निवड

Vasantrao Naik Vidyalaya : शालेय जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बिबी येथील १९ वर्षांखालील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशाच्या जोरावर संघाने विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपली पात्रता निश्चित केली आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Vasantrao

बिबीच्या खेळाडूंची जिल्ह्यावर छाप; १९ वर्षांखालील टेनिस क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांक

रमेश खंडागळे

बीबी  : शालेय जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बिबी येथील १९ वर्षांखालील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशाच्या जोरावर संघाने विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपली पात्रता निश्चित केली आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

१९ नोव्हेंबर रोजी जानेफळ येथील वडणकर मैदानावर आयोजित शालेय जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत बिबीच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची चमक दाखवली. उत्कृष्ट सांघिक समन्वय, नियोजनबद्ध खेळ, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात करत त्यांनी जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले. खेळाडूंनी मैदानावर दाखविलेली एकजूट आणि विजयासाठीची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांच्या यशात महत्त्वपूर्ण ठरली.

या विजयामुळे महाविद्यालय परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रामकृष्ण शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव अभय भाऊ चव्हाण तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य एस. आर. राठोड यांनी संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आणि विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही खेळाडूंचे कौतुक करून पुढील स्पर्धेतही घवघवीत यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही महाविद्यालयाकडून सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश त्यांच्या कठोर परिश्रमाचे, क्रीडा कौशल्याचे आणि महाविद्यालयातील सकारात्मक शैक्षणिक व क्रीडाविषयक वातावरणाचे फलित असल्याची भावना व्यक्त होत आहे.

शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रातही यशाची नवनवीन शिखरे गाठणाऱ्या वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बिबीच्या या यशस्वी संघाने परिसरातील विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. विभागीय स्तरावरही हा संघ अशीच दमदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top