Mahabreaking

[breaking_news]

  Various projects :चिखलदरा येथे स्कायवॉक, गोलमार्ग, ग्लो गार्डनसह विविध प्रकल्प राबविणार – जिल्हाधिकारी  येरेकर       

  Various projects : चिखलदरा परिसरात पर्यटनविकासाला मोठा वाव असून येथे स्कायवॉक, २७ किलोमीटरचा गोलमार्ग, ग्लो गार्डन तसेच आमझरी येथे ‘मधाचे गाव’ अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करून चिखलदराला आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

  Various projects

                                                                                                 
अमरावती : चिखलदरा परिसरात पर्यटनविकासाला मोठा वाव असून येथे स्कायवॉक, २७ किलोमीटरचा गोलमार्ग, ग्लो गार्डन तसेच आमझरी येथे ‘मधाचे गाव’ अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करून चिखलदराला आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यटन व पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. यावेळी श्री. येरेकर यांनी सिडकोमार्फत उभारण्यात येणाऱ्या स्कायवॉक प्रकल्पाची माहिती घेतली. स्कायवॉकची लांबी लक्षात घेता मध्यभागी कायमस्वरूपी आधार देणे आवश्यक असून त्यासाठी वनविभागाची परवानगी घेण्यात आली आहे. तसेच या भागातून माकड किंवा इतर प्राणी चढू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

याशिवाय वनक्षेत्रातून जाणाऱ्या २७ किलोमीटरच्या गोलमार्गासाठी वनविभागाची परवानगी घेणे, ग्लो गार्डन उभारणीची शक्यता तपासणे तसेच चिखलदऱ्यात ट्रेकिंगचे पर्याय विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले. पावसाळ्यानंतर मार्चपर्यंत पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी वनविभागाने ट्रेक मार्ग निश्चित करावेत, असेही त्यांनी सांगितले. पर्यटनविकासामुळे चिखलदरामध्ये मोठा बदल घडू शकतो, त्यामुळे पर्यटकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

पीएम मित्रा पार्क परिसरातील महापारेषण उपकेंद्राचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन देताना मेळघाटातील २२ गावांच्या वीजप्रश्न सोडविण्यासाठीही प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाल्यानंतर पुढील कामे गतीने पूर्ण करण्यात येणार आहेत.

आमझरी येथे ‘मधाचे गाव’ विकसित करण्याचे काम सुरू असून शबरी महामंडळाने एकत्रितरीत्या रिसॉर्ट उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास पर्यटकांना अधिक सुविधा उपलब्ध होतील. तसेच जिल्ह्यात कोल्ड स्टोअरेज व संत्रा प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top