Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Time flies on a student :परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला,भरधाव ट्रकने चिरडले

Time flies on a student : भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याने परीक्षेसाठी निघालेल्या २३ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील मालगणी फाटा येथे गुरुवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात एकलारा येथील शंतनू नारायण अंभोरे यांचा करुण अंत झाला.

Time flies on a student
मालगणी फाटा येथे भीषण अपघात; विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

चिखली : भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याने परीक्षेसाठी निघालेल्या २३ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील मालगणी फाटा येथे गुरुवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात एकलारा येथील शंतनू नारायण अंभोरे यांचा करुण अंत झाला.

एकलारा येथील रहिवासी असलेले शंतनू अंभोरे हे बुलढाणा येथील डॉ. गोडे कॉलेजमध्ये बीएससी द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होते. अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी ते एमएच-२८-एजी-५४७१ क्रमांकाच्या दुचाकीने एकलारा येथून चिखलीमार्गे बुलढाण्याकडे निघाले होते. मालगणी फाट्याजवळील जामवाडी परिसरात त्यांनी रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून लघुशंकेसाठी थांबले असता बुलढाण्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच-१९-झेड-५६८६ क्रमांकाच्या ट्रकने त्यांना जोरदार धडक देत चिरडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून अपघातास कारणीभूत ट्रक ताब्यात घेतला असून मृतदेह चिखली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतकाचे काका समाधान अंभोरे यांच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अपघातानंतर पसार झालेल्या चालकाचा शोध सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top