Independence Day: बिबी येथील अद्विका कनिष्ठ महाविद्यालयात १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

अद्विका महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष; विद्यार्थ्यांनी वाढविला देशभक्तीचा उत्साह
रमेश खंडागळे
बिबी : बिबी येथील अद्विका कनिष्ठ महाविद्यालयात १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी ‘जय गुरुदेव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था’चे संस्थापक अध्यक्ष अनंता मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीमध्ये बजावावयाची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत देशभक्तीपर वातावरण निर्माण केले आणि स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला. उपस्थित मान्यवरांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी संचालिका पुष्पा रामेश्वर बनकर, प्राचार्य, विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ, नागरिक, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करून १५ ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला.

