Independence Day : बिबी येथील वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात व्यसनमुक्तीचा संकल्प; बिबी येथे देशभक्तीमय वातावरण
रमेश खंडागळे
बिबी : बिबी येथील वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी रामकृष्ण शिक्षण प्रसारक संस्था, हनवतखेड (बिबी)चे सचिव अभय चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थी व मान्यवरांनी उभे राहून व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमाचे हे विशेष आकर्षण ठरले. तसेच व्यसनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. डी. मोरे सर यांनी केले. त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीमध्ये बजावावयाची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंदारे सर यांनी केले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ, नागरिक, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर वातावरण निर्माण करत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला. उपस्थित मान्यवरांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शेवटी विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

