Mahabreaking

[breaking_news]

 ICT Lab in Javalkhed :जवळखेड येथील शाळेच्या ICT लॅबची तोडफोड; ४३ हजारांहून अधिक नुकसान

ICT Lab in Javalkhed : तालुक्यातील जवळखेड येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेतील संगणक कक्षाची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करून मोठे नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात शासकीय मालमत्तेचे नुकसान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ICT Lab in Javalkhed

अज्ञातांकडून संगणक कक्षावर हल्ला; मॉनिटर, की-बोर्ड व स्पीकर फोडले

गजानन तिडके

देऊळगाव राजा : तालुक्यातील जवळखेड येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेतील संगणक कक्षाची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करून मोठे नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात शासकीय मालमत्तेचे नुकसान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मुख्याध्यापक राजेंद्र भिमराव खेडेकर (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत शाळेला अत्याधुनिक ICT लॅब उपलब्ध करून देण्यात आली होती. या संगणक कक्षात १० संगणक, २० खुर्च्या, १० सीपीयू, १० यूपीएस, ११ टेबल, १० मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर संच तसेच अन्य साहित्य उपलब्ध होते.

दि. ११ मे २०२६ रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते दि. १२ मे रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी संगणक कक्षाच्या पश्चिमेकडील दोन खिडक्यांची तोडफोड करून त्या वाकवून उघडल्या. त्यानंतर कक्षातील ५ मॉनिटर, ५ की-बोर्ड, एक स्पीकर संच आणि पूर्वीचा मोठा स्पीकर यांची तोडफोड करण्यात आली. काही मॉनिटर खिडकीतून बाहेर फेकून दिल्याचेही निदर्शनास आले. या प्रकारात अंदाजे ४३ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले असून विद्युत पुरवठ्याच्या अर्थिंगचीही तोडफोड करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम अप क्रमांक २०८/२०२६ अन्वये कलम ३(१) शासकीय मालमत्तेचे नुकसान अधिनियमांतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची नोंद पोहेका गजानन काकड यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका समाधान गिते करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top