Mahabreaking

[breaking_news]

young man dies :धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी तरुणाचा मृत्यू; बोरगाव मंजू पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन

young man dies : बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वेमार्गावर शुक्रवारी (दि. २४ जुलै) सकाळी धावत्या रेल्वेतून पडून एका अंदाजे ३० ते ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मृताची ओळख पटविण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ps

 बोरगाव मंजू रेल्वेमार्गावर आढळला अनोळखी मृतदेह; पोलिसांकडून नागरिकांना सहकार्याचे आवाहन

 बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वेमार्गावर शुक्रवारी (दि. २४ जुलै) सकाळी धावत्या रेल्वेतून पडून एका अंदाजे ३० ते ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मृताची ओळख पटविण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजूजवळील रेल्वेमार्गावर एक व्यक्ती मृतावस्थेत पडल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी बोरगाव मंजू पोलिस ठाण्याला दिली. त्यानंतर पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रमोद गोपनारायण, अनिल आंबिलकर व अमोल मोरे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाचा व परिसराचा पंचनामा केला.

मृत इसमाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून, त्याने काळ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. त्याच्या उजव्या हातात रुद्राक्षाची माळ होती, तसेच उजव्या हातावर “माॅ” असे गोंदलेले असल्याचे पोलिसांना आढळून आले. मात्र, घटनास्थळी त्याची ओळख पटविण्यास मदत होईल असे कोणतेही ओळखपत्र किंवा अन्य साहित्य मिळून आले नाही.

प्राथमिक तपासात संबंधित इसमाचा रेल्वे प्रवासादरम्यान धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय भारसाकळे व अमोल मोरे पुढील तपास करीत आहेत.

आवाहन : सदर अनोळखी इसमाची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा तो कोणाचा नातेवाईक अथवा परिचित असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ बोरगाव मंजू पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top