Mahabreaking

[breaking_news]

Nitin Deshmukh :उद्धव ठाकरे यांचे ‘मिशन विदर्भ’! नितीन देशमुखांकडे अकोला, अमरावती, बुलडाण्याची जबाबदारी

Nitin Deshmukh : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (९ सप्टेंबर) ‘मातोश्री’वर घेतलेल्या बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रमुख नेते आणि विश्वासू पदाधिकाऱ्यांवर विविध लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवली. या संघटनात्मक फेररचनेत पक्षाचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांच्यावर अकोला, अमरावती आणि बुलडाणा या तीन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची या मतदारसंघांचे संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Nitin Deshmukh

ठाकरेंचा विश्वास नितीन देशमुखांवर; तीन लोकसभा मतदारसंघांचे संपर्कप्रमुखपद सोपवले

अकोला : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (९ सप्टेंबर) ‘मातोश्री’वर घेतलेल्या बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रमुख नेते आणि विश्वासू पदाधिकाऱ्यांवर विविध लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवली. या संघटनात्मक फेररचनेत पक्षाचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांच्यावर अकोला, अमरावती आणि बुलडाणा या तीन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची या मतदारसंघांचे संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

‘मातोश्री’वर झालेल्या या बैठकीला पक्षाचे नेते, प्रवक्ते, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, सुषमा अंधारे यांच्यासह अमरावती, बुलडाणा तसेच राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

नितीन देशमुख यांच्याकडे एकाचवेळी अकोला, अमरावती आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आल्याने विदर्भातील शिवसेना संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने या नियुक्तीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी काळात स्थानिक पातळीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवणे, संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि पक्षाचा जनाधार वाढवणे, हे देशमुखांसमोरील प्रमुख आव्हान असणार आहे.

‘संघटना मजबूत करा, काळ आपलाच आहे!’

पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक ताकद वाढवण्याचा सूचक संदेश दिला. ‘येणारा काळ आपलाच आहे,’ असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे निर्देश दिले.

राज्यात पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले असल्याचा मुद्दाही बैठकीत अधोरेखित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

त्यामुळे एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू असतानाच दुसरीकडे संघटनात्मक पातळीवर पक्षाची ताकद वाढविण्याची रणनीती शिवसेनेकडून आखली जात असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे. अकोला, अमरावती आणि बुलडाणा या तीन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी नितीन देशमुखांकडे सोपवणे हा त्याच रणनीतीचा महत्त्वाचा भाग मानला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top