Mahabreaking

[breaking_news]

  Two trucks: पातूर-बाळापूर महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक; एक चालक जखमी, दुसरा फरार

Two trucks: पातूर-बाळापूर महामार्गावर पातूर शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महात्मा फुले महाविद्यालयासमोर दोन मालवाहू ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एका ट्रकचा चालक जखमी झाला असून, दुसऱ्या ट्रकचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

truck

   महात्मा फुले महाविद्यालयासमोर भीषण अपघात; दोन ट्रकच्या धडकेने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

पातूर : पातूर-बाळापूर महामार्गावर पातूर शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महात्मा फुले महाविद्यालयासमोर दोन मालवाहू ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एका ट्रकचा चालक जखमी झाला असून, दुसऱ्या ट्रकचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

प्राप्त माहितीनुसार, GJ 12 BW 5428 आणि RJ 09 GB 6180 या क्रमांकांच्या दोन ट्रकमध्ये ही धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, एका ट्रकचा चालक अनूप यादव (वय ३७, रा. बिहार) जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलीस आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.

जखमी चालकाला रुग्णवाहिका आणि डॉ. फैजान यांच्या मदतीने प्राथमिक उपचारासाठी पातूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले.

दरम्यान, अपघातानंतर RJ 09 GB 6180 या क्रमांकाच्या ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहनांची वर्दळ प्रभावित झाली होती. पातूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, या अपघाताचा पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top