Mahabreaking

[breaking_news]

Two speeding bikes :मोंढ्याजवळ दोन भरधाव दुचाकींची धडक; एक जखमी

Two speeding bikes : शहरातील मोंढ्याजवळ भरधाव आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या अपघातात एका दुचाकीस्वारास दुखापत झाली असून, त्याचबरोबर धडक देणारा दुचाकीस्वारही जखमी झाला आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी किरण बंडू शिंदे (रा. सातेफळ रोड, देऊळगाव राजा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Thieves go

निष्काळजीपणे दुचाकी चालविणे बेतले जीवावर; देऊळगाव राजात अपघातप्रकरणी गुन्हा दाखल

 गजानन तिडके

देऊळगाव राजा : शहरातील मोंढ्याजवळ भरधाव आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या अपघातात एका दुचाकीस्वारास दुखापत झाली असून, त्याचबरोबर धडक देणारा दुचाकीस्वारही जखमी झाला आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी किरण बंडू शिंदे (रा. सातेफळ रोड, देऊळगाव राजा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोहर कपूरचंद मारोठे (वय ५१, रा. सिव्हील कॉलनी, देऊळगाव राजा) यांचा भाऊ ११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८ वाजता मोटारसायकल क्रमांक एमएच २८ सीए ८४९४ वरून मिस्त्री कोटकर पेट्रोलपंपाच्या दिशेने घरी येत होता. तो मोंढ्याजवळील रस्त्यावर आला असता आरोपी किरण बंडू शिंदे हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत आला.

यावेळी शिंदे याने मारोठे यांच्या भावाच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मारोठे यांच्या भावाला दुखापत झाली. तसेच धडक देणारा किरण शिंदे हादेखील जखमी झाला. घटनेनंतर याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात कायमी अप क्रमांक ३६९/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१ आणि १२५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर सानप (ब.नं. १८३६) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन काकड (ब.नं. २०५०) यांनी केली.

दरम्यान, या अपघाताची नेमकी परिस्थिती, दोन्ही वाहनांचा वेग आणि अपघातास कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीबाबत पोलीस तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top