Rupesh Tathe : तालुक्यातील टाकरखेडा भागिले या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून क्रिकेटच्या मैदानावर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रूपेश रघुनाथ ताठे याची इंग्लंडमधील मिनी काऊंटी क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रिकेट कारकीर्दीतील या महत्त्वपूर्ण टप्प्यासाठी रूपेशची विमानाने इंग्लंडकडे रवानगी झाली आहे.

टाकरखेडा भागिलेच्या मातीतून इंग्लंडच्या मैदानावर; रूपेश ताठेची दमदार भरारी
गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील टाकरखेडा भागिले या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून क्रिकेटच्या मैदानावर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रूपेश रघुनाथ ताठे याची इंग्लंडमधील मिनी काऊंटी क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रिकेट कारकीर्दीतील या महत्त्वपूर्ण टप्प्यासाठी रूपेशची विमानाने इंग्लंडकडे रवानगी झाली आहे.
रूपेशचे वडील रघुनाथ नामदेव ताठे हे शेतकरी आहेत. ग्रामीण आणि प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या रूपेशने लहानपणापासूनच क्रिकेटची आवड जोपासली. परिस्थितीची पर्वा न करता नियमित सराव, कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने क्रिकेटच्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले.
स्थानिक पातळीवरील सामन्यांपासून सुरू झालेला रूपेशचा क्रिकेट प्रवास आता थेट इंग्लंडच्या मैदानापर्यंत पोहोचला आहे. इंग्लंडच्या मिनी काऊंटी क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची मिळालेली संधी ही त्याच्या आजवरच्या मेहनतीला मिळालेली मोठी पावती मानली जात आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील तरुणाने परदेशातील क्रिकेट स्पर्धेत खेळण्यापर्यंत मजल मारल्याने टाकरखेडा भागिले आणि परिसरात त्याच्या यशाची चर्चा होत आहे. ग्रामीण भागातील तरुणांनीही जिद्द, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवू शकते, याचे रूपेश ताठे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

