Mahabreaking

🔴 BREAKING
Married Woman Harassed :विवाहितेचा छळ, मारहाण आणि घराबाहेर काढले; देऊळगाव राजात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा 5 kg of Ganja :५ किलो गांजासह अल्पवयीन ताब्यात, देऊळगाव राजात खळबळ Multi-crore Forensic Van :कोट्यवधींची फॉरेन्सिक व्हॅन ‘धक्का स्टार्ट’वर; पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ₹1.75 Crore Scam in Murtizapur :मूर्तिजापुरात १ कोटी ७५ लाखांचा घोटाळा; आरोपींच्या अटकेसाठी व्यापाऱ्यांचा आक्रोश मोर्चा Two More Accused Arrested :युवकाच्या खून प्रकरणातील आणखी दोन आरोपी गजाआड, मेहकर पोलिसांची कारवाई Sand Mafia Launches :रेतीमाफीयाचा नांदुरा तहसीलदारांवर कॅबीनमध्ये शिरून प्राणघातक हल्ला Married Woman Harassed :विवाहितेचा छळ, मारहाण आणि घराबाहेर काढले; देऊळगाव राजात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा 5 kg of Ganja :५ किलो गांजासह अल्पवयीन ताब्यात, देऊळगाव राजात खळबळ Multi-crore Forensic Van :कोट्यवधींची फॉरेन्सिक व्हॅन ‘धक्का स्टार्ट’वर; पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ₹1.75 Crore Scam in Murtizapur :मूर्तिजापुरात १ कोटी ७५ लाखांचा घोटाळा; आरोपींच्या अटकेसाठी व्यापाऱ्यांचा आक्रोश मोर्चा Two More Accused Arrested :युवकाच्या खून प्रकरणातील आणखी दोन आरोपी गजाआड, मेहकर पोलिसांची कारवाई Sand Mafia Launches :रेतीमाफीयाचा नांदुरा तहसीलदारांवर कॅबीनमध्ये शिरून प्राणघातक हल्ला

Two More Accused Arrested :युवकाच्या खून प्रकरणातील आणखी दोन आरोपी गजाआड, मेहकर पोलिसांची कारवाई

Two More Accused Arrested : तालुक्यातील सुकळी येथील विनोद अश्रुबा नवले यांचा चार वर्षापूर्वी खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना आधीच अटक केली आहे. पोलीस कोठडीतील चौकशीतून आणखी दोन आरोपींचा या खूनात सहभाग असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्यांनाही अटक केली.

Two More Accused Arrested

 मेहकर : तालुक्यातील सुकळी येथील विनोद अश्रुबा नवले यांचा चार वर्षापूर्वी खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना आधीच अटक केली आहे. पोलीस कोठडीतील चौकशीतून आणखी दोन आरोपींचा या खूनात सहभाग असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्यांनाही अटक केली.

मेहकर तालुक्यातील सुकळी येथील विनोद आश्रुबा नवले वय ३८ याचा मेहकर  मोळा रोड वरील जामगाव शिवारातील एका शेतात असलेल्या हॉटेलमध्ये दोन मे २०२२ रोजी खून करून त्याचे प्रेत जमिनीत गाडून ठेवले होते. तब्बल चार वर्षानंतर या खूनाचा उलगडा झाला असून २१ एप्रिल रोजी याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सुनील बाजीराव जाधव रा. सुकळी आणि सचिन ज्ञानेश्वर उगले रा. अण्णाभाऊ साठे नगर मेहकर या दोन जणांना अटक केली होती. उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी ,उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, नायब तहसीलदार अजय पिंपरकर ,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित धांडे, सरकारी पंच आणि मयताचे नातेवाईक व आरोपी यांच्या उपस्थितीत जामगाव शिवारातील घटनास्थळी खोदकाम करून मृतकाचा सांगाडा जमिनीतून काढण्यात आला होता.    न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडीत आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यात आणखीन दोन जणांचा सहभाग असल्याचे आढळून आले. पोलीस अधीक्षक निलेश तांबे ,अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी श्री आलेवार आणि त्यांचे सहकारी सुखदेव गव्हाणे ,प्रभाकर शिवणकर, लक्ष्मण कटक ,मोहम्मद परसुवाले, केशव अवचार ,इब्राहिम परसुवाले ,शिवाजी चिम ,आम्रपाली सरकटे, लक्ष्मी साखरे यांनी पवन रामचंद्र घेवंदे व २८रा. महिला महाविद्यालय मागे मेहकर हल्ली मुक्काम संभाजीनगर चिखली आणि अंकुश दत्तात्रय बोडखे राहणार जामगाव अशा दोघांना अटक केली. सर्व चार आरोपींनी मिळून कट रचून मयताचा धारदार शस्त्राने खून करून त्याचे प्रेत जमिनीत पुरले असे निष्पन्न झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top