Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Hind Di Chadar :‘हिंद दी चादर’ शहिदी समागमानिमित्त मुंबई उपनगरात दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान 

Hind Di Chadar : संतांच्या भूमीत गुरू तेग बहादुर यांच्या गौरवशाली शहादतीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी ओवे मैदान, खारघर (नवी मुंबई) येथे भव्य शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले.

Hind Di Chadar

मुंबई/यवतमाळ : संतांच्या भूमीत गुरू तेग बहादुर यांच्या गौरवशाली शहादतीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी ओवे मैदान, खारघर (नवी मुंबई) येथे भव्य शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले.

कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, आरोग्य, शिक्षण व पोलीस विभागांचे प्रतिनिधी तसेच गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कटीयार म्हणाले की, संस्कृतीरक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी गुरू तेग बहादुर यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. त्यांच्या शहादतीचा इतिहास शाळा, महाविद्यालये, संस्था आणि गुरुद्वारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील सुमारे ३ लाख २० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वक्तृत्व, निबंध व घोषवाक्य स्पर्धा तसेच प्रभातफेरीद्वारे जनजागृती केली जात आहे.

थीम साँग, माहितीपट आणि व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून २०० शाळा जोडण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती दिली जात आहे. चेंबूर, देवनार आणि मानखुर्द येथून नवी मुंबईकडे जाणाऱ्या भाविकांसाठी वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेची विशेष तयारी करण्यात आली आहे.

या शहीदी समागमानिमित्त सिख, सिकलगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन आणि वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी सुमारे ३०० वर्षांनंतर एकत्र येणार असून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दृढ होणार आहे. भाविकांसाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

बैठकीत विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पश्चिम उपनगरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, सहायक जनसंपर्क अधिकारी विवेक राठोड, पूर्व उपनगरच्या उपविभागीय अधिकारी कल्पना गोडे, तहसीलदार युवराज बांगर, तहसीलदार इरेश चप्पलवार, तहसीलदार स्नेहलता स्वामी, नायब तहसीलदार सुनील कापडनिस तसेच गुरुद्वारा प्रतिनिधी मनमोहन सिंग, सुखविंदर सिंग, गुरपिंदर सिंग आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top